आरोग्यासाठी केळ हे फळ फायदेशीर

आरोग्यासाठी केळ हे फळ फायदेशीर

मुंबई : आरोग्यासाठी केळ हे फळ फायदेशीर आहे. भूक लागली की आपण केळ खाल्यानंतर भूक मिटून जाते. केळीचे भरपूर फायदे आहे. केळ्यात मोठ्या प्रमाणात थायमिन, रिबोफ्लेबिन, नियासिन, फॉलिक अॅसिड सारखी पोषक तत्वे असतात जी आपल्या शरीरासाठी गरजेची असतात. केळी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्याचे शरीराला अधिक फायदे होतात.असे म्हणतात की, केळी खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो. मात्र केळी खाल्ल्यानं वजन वाढत नाही तर आरोग्यास अनेक फायदे होतात. असं संशोधनातून समोर आलं आहे. दररोज तीन लहान केळी खाल्ल्यानं जितकी एनर्जी मिळते तितकी 90 मिनिटे वर्कआउट केल्यानं मिळते. केळी खाल्यानं केवळ एनर्जीच मिळत नाही तर तुम्ही फिट आणि हेल्दी देखील राहता.

केळी खाण्याचे आरोग्यदायी फायदे….

1 महिलांसाठी केळी खाणे गरजेचे त्यामुळे हाडे मजबूत होतात.
2 केळी खाण्याने ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये राहतो.
3 केळ्यातील व्हिटामिन बीमुळे रक्तातील ग्लुकोजवर नियंत्रण राहते.
4 केळ्यात आर्यन असते ज्यामुळे ऍनिमियाचा धोका टळतो.
5 रिसर्चनुसार, केळी खाल्ल्याने डिप्रेशन दूर होते. केळ्यांमधील प्रोटीनमुळे केवळ मूड चांगला होतो.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version