2025 या वर्षात अनेक घडामोडी घडल्या. मनोरंजनसह क्रिकेट विश्वासाठीही हे वर्ष अनपेक्षित घडामोडींचे ठरले आहे. यावर्षी क्रिकेट क्षेत्रात अनेक खेळाडूंनी स्वत:च्या नावे नवा विक्रम कोरला तसेच अनेक खेळाडू त्यांच्या वैयक्तिक प्रकरणांमुळे चर्चेचा विषय ठरले. अशातच गुगलने 2025 मध्ये सर्वाधिक शोधल्या गेलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे बॉलिवूड आणि राजकीय व्यक्तिमत्त्वे या यादीत नेहमीच पाहायला मिळतात.
हेही वाचा- Year Ender 2025 : 2025 मध्ये आर्यन खान ते सोनू सूद यांनी दिग्दर्शनात ठेवले पहिले पाऊल
परंतु आंतरराष्ट्रीय आणि फ्रँचायझी दोन्ही स्तरावर खेळाडूंनी केलेल्या काही मोठ्या कामगिरीनंतर क्रिकेटर्सने देखील या वर्षी गुगलसर्चमध्ये आपली जागा निर्माण केली आहे. या यादीत अव्वल स्थानी भारताचा सर्वात तरुण खेळाडू म्हणजेच 14 वर्षीय प्रतिभावान वैभव सूर्यवंशी आघाडीवर आहे. वैभव युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये शतक ठोकणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला असून त्याने भारताच्या प्रमुख टी-20 स्पर्धेत चमक दाखवली आहे. वैभव सूर्यवंशी 14 वर्षाचा असून त्याने आयपीएलनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपली जोरदार खेळीचे प्रदर्शन करत चाहतावर्ग निर्माण केला आहे.
वैभवला आज देशातील सर्वोच्च बाल सन्मान म्हणजेच 'पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारा'ने गौरवण्यात आले. त्याचसोबत या यादीत महिला खेळाडूंनी देखील आपल स्थान निर्माण केलं आहे. यात 50 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जेमिमाने तिच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची खेळी खेळून महिला क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव नोंदवले. तिच्या नाबाद 127 धावांच्या खेळीमुळे भारताला बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघावर मात करून ट्रॉफी जिंकता आली. दरम्यान 2025 मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या 10 भारतीय व्यक्तिमत्त्वांची यादी पुढीलप्रमाणे आहे:
हेही वाचा- Year Ender 2025 : 2025 मध्ये लग्नबंधनात अडकलेली लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपी
क्रमांक नाव व्यवसाय
1 वैभव सूर्यवंशी क्रिकेटपटू
2 प्रियांश आर्य क्रिकेटपटू
3 अभिषेक शर्मा क्रिकेटपटू
4 शेख रशीद क्रिकेटपटू
5 जेमिमा रॉड्रिग्ज क्रिकेटपटू
6 आयुष म्हात्रे क्रिकेटपटू
7 स्मृती मानधना क्रिकेटपटू
8 करुण नायर क्रिकेटपटू
9 उर्विल पटेल क्रिकेटपटू
10 विघ्नेश पुथूर क्रिकेटपटू
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.