इंग्लंडचा दारूण पराभव

इंग्लंडचा दारूण पराभव

बंगलुरू, २६ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडचा दारूण पराभव झाला. श्रीलंकेने इंग्लंड विरुद्धचा सामना आठ गडी राखून जिंकला. इंग्लंड विरुद्धच्या विजयानंतर श्रीलंका चार गुणांसह गुण तालिकेत पाचव्या स्थानावर आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने ३३.२ षटकांत सर्वबाद १५६ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेने २५.४ षटकांत २ बाद १६० धावा करत सामना जिंकला. श्रीलंकेचा लाहिरू कुमारा सामनावीर झाला. त्याने सात षटकांत पस्तीस धावा देत बेन स्टोक्स, जोस बटलर आणि लिव्हिंगस्टोन या तीन खेळाडूंना बाद केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version