इमरान खान यांची खुर्ची जाणार?

इमरान खान यांची खुर्ची जाणार?

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने इमरान खान यांच्या विरोधात निकाल दिला आहे. इमरान खानविरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर ९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तसेच पाकचे संसद विसर्जित करणे चुकीचे असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. दरम्यान, पाक संसद पुनर्स्थापित करण्यात आले.

इमरान खान यांच्या अविश्वास प्रस्तावावर ९ एप्रिल रोजी मतदान होणार असून या पाकिस्तानात इमरान खान यांची खुर्ची जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

पक्षीय बलाबल

  • पाकिस्तान संसद : एकूण जागा ३४२

  • बहुमतासाठी आवश्यक : १७२ मतं

  • इम्रान सोबत : १४२ खासदार

  • विरोधी पक्षाकडे : १९९ खासदार

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version