Dahi Handi 2026 : जल्लोषात आणि आनंदात चैतन्याची फोडा हंडी, दहीहंडीच्या आपल्या प्रियजनांना पाठवा ‘या’ खास शुभेच्छा

दहीहंडीनिमित्त तुम्हीही तुमच्या प्रियजनांना दहीहंडीच्या काही खास शुभेच्छा संदेश पाठवा...
Dahi Handi 2026 : जल्लोषात आणि आनंदात चैतन्याची फोडा हंडी, दहीहंडीच्या आपल्या प्रियजनांना पाठवा ‘या’ खास शुभेच्छा

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवानंतर दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.  भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांची आठवण करून देणाऱ्या या उत्सवात गोविंदा पथके मानवी मनोरे रचून उंचावर बांधलेली दही-दुधाने भरलेली हंडी फोडतात. हंडी फोडताना होणारी पाण्याची फवारणी, ढोल-ताशांचा गजर आणि ‘गोविंदा आला रे’च्या जयघोषाने परिसर उत्साहाने दुमदुमून जातो.

यंदा दहीहंडी 5 सप्टेंबरला आली आहे. दहीहंडी हा केवळ धार्मिक उत्सव नसून एकता, संघभावना आणि धैर्याचे प्रतीक मानला जातो. हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकातील प्रत्येक सदस्य एकमेकांना आधार देत मानवी मनोरा उभा करतो. दहीहंडीनिमित्त तुम्हीही तुमच्या प्रियजनांना दहीहंडीच्या काही खास शुभेच्छा संदेश पाठवा…

हातात घेऊनी बासरी आला कृष्ण
थरावर थर रचून झाले मित्र सज्ज
मटकी फोडू, खाऊ लोणी
गोविंदा रे गोपाळा गाऊ गाणी
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

विसरून सारे मतभेद,
लोभ अहंकार दूर सोडा..
सर्वधर्म समभाव मनात जागवून,
आपुलकीची दहीहंडी फोडा..
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

दह्यात साखर, साखरेत भात
दहीहंडी उभी करुन देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावून उंच थर,
जोशात साजरा करुया दहीहंडीचा हा सण,
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

दह्याची हंडी पाण्याची फवार,
लोणी चोरायला आले कृष्णराज
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

चंदनाचा सुवास,फुलांचा वर्षाव,
दह्याची हंडी आणि पावसाची बरसात,
लोणी चोरायला आला माखनलाल,
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

फुलांचा हार, पावसाची सर
राधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहर
साजरा करुया गोपालकाल्याचा सण!
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version