Sanjay Raut : चिल्लर हिंदुहृदयसम्राट कुठे होते? राऊतांची शिंदेंवर जोरदार टीका; डीजेचं समर्थन करणाऱ्या मंत्र्यांवरही चढवला हल्ला

संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधत असताना डीजेचं समर्थन करणाऱ्या राज्यातील मंत्र्यांवरही हल्ला चढवला आहे.
Sanjay Raut : चिल्लर हिंदुहृदयसम्राट कुठे होते? राऊतांची शिंदेंवर जोरदार टीका; डीजेचं समर्थन करणाऱ्या मंत्र्यांवरही चढवला हल्ला

संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधत असताना ठाकरेंच्या नगरसेवकांच्या पदावर असलेल्या याचिकेबद्दल भूमिका मांडली. मुंबई महानगरपालिकेत तब्बल 79 नगरसेवकांच्या निवडीविरोधात न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या 16 नगरसेवकांवर टांगती तलवार असून त्यातच ठाकरेंचे नगरसेवक विशाखा राऊत यांचे पद रद्द होणार असल्याची आज महापालिका सभागृहात घोषणा होणार आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘भाजप च्या 27 नगरसेवकचा जात प्रमाणपत्र वादग्रस्त आहे… 9 शिंदे गटाच्या नगरसेवक जात प्रमाणपत्र वादग्रस्त आहे. त्यांच्यावर कधी कारवाई केली..? कधी होणार? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फोन करतात.. कोणाचा जात प्रमाणपत्र वैध ठेवायचं आणि कोणाचा रद्द करायचा.’

पुढे डीजेचं समर्थन करणाऱ्या राज्यातील मंत्र्यांवरही हल्ला चढवला. संजय राऊत म्हणाले की, “डीजे बंदी समर्थन सगळं राज्य करताय. गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी समर्थन केलं. त्यांनी त्यांच्या सोसायटी मध्ये डीजे वाजवावा. डी जे मुळे काय काय होताय? काय अपाय होतात हे लोक सांगताय. मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या डीजे मुळे त्यांच्या भावाचा जीव गेला. पिपंरी चिंचवड मधील एका महिलेचा प्रतिक्रिया ऐकली त्यांच्या वडिलांनी प्राण सोडला या डीजे मुळे…”

“मुख्यमंत्री कुंपणवर आहेत, मुख्यमंत्री यांच्यावर कोणाचा दबाव आहे का? नागपूर मध्ये बंदी मग पुण्यात का नाही? बापट हे आंदोलनात सहभागी झाले नाही.. कारण त्यांना पोलिसानी सांगितलं जीवितास धोका आहे… गृहमंत्री यांनी यावर स्पष्टीकरण द्यायला हवं. कोण आहेत त्यांच्या वर हल्ला करणारे धमक्या देणारे. या राज्याला पुर्णवेळ गृहमंत्री हवाय… कारण ते कुंपणवर आहेत. लोकमान्य टिळक मंडालेतून बाहेर आले तेंव्हा डी जे वाजला नव्हता. उत्तरेची संस्कृती येथे आणण्याची गरज नाही…”

हेही वाचा- Manoj Jarange Patil Maratha Reservation: …तर 10 मिनिटांत अख्खा महाराष्ट्र बंद पाडणार! जरांगेंच्या डोक्यात नेमकं चाललंय काय? सरकारला दिला थेट इशारा

पुढे संजय राऊतांनी ठाण्यातील दहिहंडीला आयोजित केलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावर बोलताना एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे. यावेळी संजय राऊत म्हणाले की, “गौतमी पाटील यांना ठाण्यात कोणी नाचवल ही संस्कृती आहे का? संस्कृती रक्षणाखाली भाजपचे सुपारी किल्लर फिरत आहेत… त्यांना मुख्यमंत्री यांनी आवरायला हवं. हिंदू सुरक्षित आहे… हिंदू खतरे में कसा… पंतप्रधान मोदी आहेत नां? प्रती हिंदुहृदयसम्राट आहे ना… मूळ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे प्रति आहेत. राज्यात सुद्धा काही चिल्लर हिंदुहृदयसम्राट आहेत… काल हे पुण्यात रस्त्यावर उतरले ते सुद्धा हिंदू आहेत…”

पुढे संजय राऊत म्हणाले की, “कोण करताय मागणी?बाळासाहेब ठाकरे यांचा शिवाजी महाराज यांच्या वरती फोटो आहे… तुम्ही आंदोलन करा.. ते सेनाभवन आहे बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी महाराज यांचा सन्मान होतो… जय भवानी जय शिवाजी ची घोषणा ही शिवसेनेनी आणली. जे कोणी विधीतज्ञ नाही ते सुपारी किल्लर आहेत… त्यांनी आंदोलन करावं इच्छा मरणाचा अर्ज मुख्यमंत्री यांच्याकडे करावा. तुमचा राष्ट्रशी संबंध नाही… महाराष्ट्र जडणघडणी मध्ये नाही… फक्त हे सत्ते साठी आहेत. संघाच्या मुख्यलयात कोणाचे फोटो कोणासोबत आहे… हे मला येथे बसून माहिती आहे…”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version