UPI Transactions Rule: UPI वरील शुल्काबाबबत, ‘प्रश्न शुल्क रकमेचा नाही तर…’ काय म्हणाले राज ठाकरे

UPI व्यवहारावर 2,000 रुपयांपर्यंत कोणतंही शुल्क नसेल, अशी घोषणा सरकारने केली असली तरी, त्यापुढील व्यवहारावर MDR लावण्याच्या निर्णयाचा फटका थेट मोठ्या व्यापाऱ्यांना बसणार आहे. आणि याच मुद्द्यावरून मनसे
UPI Transactions Rule: UPI वरील शुल्काबाबबत, ‘प्रश्न शुल्क रकमेचा नाही तर…’ काय म्हणाले राज ठाकरे

 

UPI व्यवहारावर 2,000 रुपयांपर्यंत कोणतंही शुल्क नसेल, अशी घोषणा सरकारने केली असली तरी, त्यापुढील व्यवहारावर MDR लावण्याच्या निर्णयाचा फटका थेट मोठ्या व्यापाऱ्यांना बसणार आहे. आणि याच मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. 

राज ठाकरेंनी X (ट्विटर) वर पोस्ट करत या नवीन शुल्क प्रणालीला कडाडून विरोध केला आहे. “प्रश्न पैशांचा नाही, हेतूचा आहे!””व्यापाऱ्यांनी या निर्णयाला सपशेल विरोध करावा,” असं आवाहनच राज ठाकरेंनी केलं आहे. सरकारने दिलेला युक्तिवाद हा ‘भंपक’ असल्याची टीका करत त्यांनी म्हटलंय की, आधी UPI फ्री म्हणायचं आणि आता हळूहळू शुल्क लावायचं, हा सामान्य माणसाला आणि व्यापाऱ्यांना लावलेला भूर्दंड आहे.

हेही वाचा – Former Union Minister Arrest: मोठी बातमी! भाजपचे माजी केंद्रीय मंत्री पोलिसांच्या ताब्यात; काय आहे नेमकं प्रकरण?

त्यांच्या या रोखठोक भूमिकेमुळे आता व्यापारी वर्गातही संतापाची लाट पाहायला मिळत आहे. केंद्र सरकार या विरोधानंतर आपल्या निर्णयावर फेरविचार करणार का? याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version