छत्रपती संभाजीनगर : “आमदार आणि खासदार तर विकत घेत आहेतच, पण आता स्वतः: स्वतःला परदेशात जाऊन पुरस्कारही विकत घेत आहेत. हा एवढा निर्लज्जपणा आपल्याला जमणार नाही; त्यामुळे तेच उलट आपल्याला सांगतील, ‘जो हमने किया, पुरस्कार खरीद लिया, ये तुमसे ना हो पाएगा!’ ” अशा अत्यंत कटू शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधून घणाघाती आरोप केला.
‘मराठवाडा होरपळतोय अन् उपमुख्यमंत्री गुजरातला पळाले’
आज 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन, पंतप्रधानांचा वाढदिवस आणि प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती असल्याचा संदर्भ देत ठाकरे म्हणाले, “मराठवाडा दुष्काळाच्या भीषण सावटाखाली होरपळत असताना, मुक्तीसंग्राम दिनाला न थांबता हे ‘पुरस्कारार्थी’ उपमुख्यमंत्री गुजरात दौऱ्यावर गेले. येथील सामान्य शेतकरी आणि जनतेच्या वेदनांशी यांचे काहीही देणेघेणे राहिलेले नाही.””गरीब शेतकऱ्याचे पोरगं म्हणवणारे नेते थेट हेलिकॉप्टरने आपल्या शेतात जातात आणि परदेशात जाऊन स्वतः-स्वतःला विकतचे पुरस्कार बहाल करून येतात,” असा शब्दांत निशाणा साधत ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.