Uddhav Thackeray Shiv Sena: मुंबईत ठाकरेंच्या गोटात खळबळ! माजी महापौरांचं नगरसेवक पद रद्द; पुढील 6 वर्षे निवडणूक लढवण्यावरही बंदी, नेमकं काय घडलं?

विशाखा राऊत यांनी मुंबई हाई कोर्टात याचिका दाखल केली होती. याबाबत मुंबई हाई कोर्टाने विशाखा राऊत यांची याचिका फेटाळली.
Uddhav Thackeray Shiv Sena: मुंबईत ठाकरेंच्या गोटात खळबळ! माजी महापौरांचं नगरसेवक पद रद्द; पुढील 6 वर्षे निवडणूक लढवण्यावरही बंदी, नेमकं काय घडलं?

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबई महापालिकेत मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटातील विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. एकीकडे शिवसेना कुणाची यावर सु्प्रीम कोर्टात खंडाजगी सुरू असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.

पालघरच्या जात पडताळणी समितीने कुणबी प्रमाणपत्र रद्द ठरवल्यानंतर विशाखा राऊत यांनी मुंबई हाई कोर्टात याचिका दाखल केली होती. याबाबत मुंबई हाई कोर्टाने विशाखा राऊत यांची याचिका फेटाळली आहे. याबाबत मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी नगरविकास खात्याला पत्र देऊन विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द झालं असल्याची माहिती दिली. त्यामुळे आता इथून पुढे सहा वर्षे विशाखा राऊत यांना निवडणूक लढवता येणार नाही. 

 

आयुक्तांचे सरकारला पाठवलेल्या पत्रात काय?
जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा निर्णय 20 ऑगस्ट रोजी घेण्यात आला होता. त्यानंतर अश्विनी भिडे यांनी 25 ऑगस्ट रोजी राज्याच्या नगरविकास विभागाच्या अपर मुख्य सचिवांना याबाबत पत्र पाठवले. त्यानंतर मुंबई महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार राऊत यांची नगरसेवक म्हणून झालेली निवड रद्द झाल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

तसेच, नगरसेवक पद रद्द झाल्यामुळे पुढील सहा वर्षे नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्यास त्या अपात्र ठरल्याचेही महापालिका आयुक्तांनी पत्रातून स्पष्ट केले आहे. ही बाब महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्याची विनंती आयुक्तांनी केली आहे. विशाखा राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकरांची कन्या प्रिया सरवणकर गुरव यांचा पराभव करत दादरमधील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या वॉर्ड क्रमांक 191 मधून निवडणूक लढवली होती. मात्र आता विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द होणार आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version