Uddhav Thackeray : ‘लाडक्या बहिणींना 6 महिन्याचे हप्ते एकत्र द्या’; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी

आज उद्धव ठाकरेंनी पत्रकारपरिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी विविध विषयांवर भाष्य केले.
Uddhav Thackeray : ‘लाडक्या बहिणींना 6 महिन्याचे हप्ते एकत्र द्या’; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी

मुंबई: आज उद्धव ठाकरेंनी पत्रकारपरिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी विविध विषयांवर भाष्य केले. यादरम्यान, जेव्हा उद्धव ठाकरेंना बिहारमधील लाडक्या बहिणींना दहा हजार रुपये दिले जातात, असे प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘बिहारने पंतप्रधान मोदींना प्रत्येक महिलेला दहा हजार रुपये देण्याचा प्रस्ताव दिला होता का? मग पंतप्रधान मोदींनी प्रत्येक महिलेला दहा हजार रुपये कसे दिले? म्हणून मी म्हणतो, ही सगळी थेरं बंद करा. महाराष्ट्र भोळा भाबडा म्हणून तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेवर अन्याय करू नका’. 

पुढे, उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘माझं आणखी एक मत आहे की निवडणुकीच्या वेळी ज्याप्रकारे तुम्ही लाडक्या बहिणीचे दोन -तीन महिन्याचे हप्ते दिले होते, तसे पुढच्या सहा महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणींना आताच द्या’. 

हेही वाचा: ST Bus Fare Hike: शिंदेंच्या सूचनेनंतर एसटी महामंडळाकडून भाडेवाढ रद्द, प्रवाशांना दिलासा

यादरम्यान, उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातील पुरपरिस्थितीबाबत प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘दोन गोष्टी तातडीने पूर्ण झाल्या पाहिजे. राज्य सरकारतर्फे पूरबाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून प्रति हेक्टर 50 हजार रुपये दिले पाहिजे. यासह, पूरबाधित शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले पाहिजे’.

‘काही दिवसांपूर्वी, मी राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांना भेट दिली. यादरम्यान, मी त्यांच्याशी चर्चा केली. तेव्हा काही शेतकरी व्याकूळ झाले होते आणि म्हणाले की आता जीव देण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. या प्रसंगी, मी त्यांना शांत करण्याचं प्रयत्न केलं. तेव्हा, मी शेतकऱ्यांना विनंती केली की तुम्ही आत्महत्येचा विचार करू नका’, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version