या मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen

या मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen

मुंबई 7 जून: संपुर्ण मनोरंजन जगतात बालाजी टेलिफिल्मस नाव फार प्रसिद्ध आहे. एकता कपूर (Ekta Kapoor) हिनं आजवर अनेक नवोदीत कलाकारांची करिअर घडवली आहेत. मात्र एक काळ असाही होता त्यावेळी एकता कपूरला या मनोरंजन जगात कोणी विचारत नव्हत त्यावेळी एक मराठी अॅक्टरने एकताची मदत केली होती. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल तिचं करिअर एका मराठी अभिनेत्यामुळं घडलं होतं. एकता आज यशाच्या शिखरावर आहे. ते म्हणजे अशोक सराफमुळे एकतानं 1995 साली ‘पडोसन’ या मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या मालिकेला फारसं यश मिळालं नाही. त्यानंतर ‘कॅप्टन हाऊस’ आणि ‘मानो या ना मानो’ अशा आणखी दोन मालिका तयार केल्या. या दोन्ही मालिका फारशा चालल्या नाही… एकताच्या सलग तीन फ्लॉप मालिका गेल्यामुळे कोणताच निर्माता तिच्यावर पैसे गुंतवायला तयार नव्हता. वडील जितेंद्र यांनी देखील निर्मितीचा नाद सोड आणि अभिनय वगैरे कर असा सल्ला तिला दिला होता. परंतु एकतानं हार मानली नाही. तिनं 1995 मध्येच एक विनोदी मालिका तयार करण्याचा निर्णय घेतला. अन् त्यावेळी मराठी सुपरस्टार अशोक सराफ यांनी तिची मदत केली. एकतानं ‘हम पांच’ नावाची मालिका तयार केली. या मालिकेत अशोक सराफ यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. पाच मुली, अन् पाचही वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या. अन् त्यामुळं वैतागलेला बाप असं या मालिकेचं स्वरुप होतं. अशोक सराफ यांची लोकप्रियता आणि धम्माल विनोद करण्याची शैली यामुळं ‘हम पांच’ सुपरहिट ठरली. अनेकदा मालिकेतील संभाषण हे सुमार दर्जाचं असायचं परंतु अशोक सराफ यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर त्याचं विनोदात रुपांतर केलं. असं स्वत: एकता कपूरनं एका मुलाखती दरम्यान सांगितलं होतं. एकताची ही मालिका फार यशस्वी ठरली त्यानंतर तिने कधीचं माहे वळूनच पाहिलं नाही. आज तिला टीव्ही इंडस्ट्रीमधील ‘गॉडमदर’ असंही म्हटलं जातं. एकताला टीव्हीच नव्हे तर वेब सीरिजमध्ये देखील ती घवघवीत यश मिळवत आहे. हम पांच मालिकेच्या यशामुळेच एकताला आणखी काही संधी मिळत गेल्या. त्यानंतर दिग्दर्शक तिच्यावर पैसे गुंतवण्यास निर्माते तयार झाले. एकताने. ‘क्योकी सास भी कभी बहु थी’, कुसुम, कहानी घर घर की, कसौटी जिंदगी की, बडे अच्छे लगते है यांसारख्या एकामागून एक सलग सुपरहिट मालिकांची निर्मिती ती करत गेली आणि आज एकता टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात अनुभवी आणि यशस्वी निर्माती म्हणून तिची ओळख ही मनोरंजन जगतात आहे. परंतु या यशाची सुरुवात अशोक सराफ या मराठी अभिनेत्यामुळं झाली होती

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version