‘…तर भूमाता ब्रिगेडच्या महिला मंत्रालयात जाऊन दारू पाजतील’

‘…तर भूमाता ब्रिगेडच्या महिला मंत्रालयात जाऊन दारू पाजतील’

महिलांचे उद्ध्वस्त होणारे संसार, वाढती गुन्हेगारी आणि तरुणांचे भवितव्य या सर्वांचा विचार करून चंद्रपूर मध्ये दारूबंदी करण्यात आली होती. पाच वर्षात सरकारचा 200 कोटीचा महसूल पाच वर्षात यामुळे बुडाला अशी टीका सुरू झाली. त्यामुळे चंद्रपूरची दारूबंदी हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

उलट महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बिहार आणि गुजरातच्या धर्तीवर “महाराष्ट्रात दारूबंदी करावी”अशी महिलांच्या वतीने आमची त्यांना विनंती आहे.

तसंच महसुलासाठी अनेक चांगले पर्याय आपल्याकडे आहेत, त्यामुळे चंद्रपूरची दारूबंदी आपण हटवू नये.

महिलांचा शाप असलेला पैसा महसूल म्हणून स्वीकारू नये.

परंतु ‘जर चंद्रपूरची दारूबंदी हटवण्यासाठी जर प्रयत्न करण्यात आली, तर जे जे मंत्री यासाठी पुढाकार घेतील त्यांना भूमाता ब्रिगेडच्या महिला मंत्रालयात जाऊन दारू पाजतील’, असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी दिला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version