Mumbai Local Train Update : मध्य रेल्वेवर अप-डाऊन लोकल सेवा कोलमडली! तब्बल दीड तास लोकल उशिरा

आज सकाळपासूनच मध्य रेल्वे हुन सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडया सीएसटीम हुन अर्धा तास उशिराने सुटत आहेत. परिणाम स्वरूप वेळापत्रक कोलमडले आहे.
Mumbai Local Train Update : मध्य रेल्वेवर अप-डाऊन लोकल सेवा कोलमडली! तब्बल दीड तास लोकल उशिरा

आज सकाळपासूनच मध्य रेल्वे हुन सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडया सीएसटीम हुन अर्धा तास उशिराने सुटत आहेत. परिणाम स्वरूप वेळापत्रक कोलमडले आहे. रविवार असल्याने काही ठिकाणी तांत्रिक कामे यामुळे देखील लोकल वाहतूक ही 10 ते 15 मिनिटांनी उशिरा धावत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कसारा-कल्याण मार्गावर पहाटेच्या सुमारास आसनगाव ते खडवली दरम्यान अप-लाइन मार्गावरील वीज पुरवठा बंद पडल्याने 4:30 ची पहिली लोकल 4:45 ते 5:25 दरम्यान अडकली असल्याची माहिती रेल्वे प्रवासी संघटनेने दिली आहे.

हेही वाचा- Mega Block: रविवारी मुंबईकरांचा खोळंबा! मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, 'या' तीन स्थानकांवर लोकल थांबणार नाही; अनेक फेऱ्या रद्द

यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप मार्गावरील लोकलचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले असून तब्बल एक ते दीड तास लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. कल्याण आणि कसारा या दोन्ही मुख्य मार्गांवरून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल गाड्या जागच्या जागी थांबल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे लोकल गाड्या अत्यंत धीम्या गतीने धावत आहेत. ज्यामुळे पहाटे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.  

दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.32 दरम्यान सुटणाऱ्या डाउन स्लो मार्गावरील लोकल सेवा माटुंगा ते मुलुंड दरम्यान फास्ट मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. त्यानंतर पुन्हा स्लो मार्गावर आणल्या जातील. या बदलामुळे संबंधित लोकल सेवा सुमारे 15 मिनिटे उशिराने धावतील. तसेच पश्चिम मार्गावरील वसई रोड ते विरारदरम्यान रेल्वे रुळ आणि सिग्नलच्या देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्या कारणाने या मार्गावर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version