‘देश विकणाऱ्यांसोबत राहायचं की वाचवणाऱ्यांसोबत?’ – नाना पटोले

‘देश विकणाऱ्यांसोबत राहायचं की वाचवणाऱ्यांसोबत?’ – नाना पटोले

शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करण्यात आली. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यावर करण्यात आलेली टीका ही देशहिताची असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे देश विकणाऱ्यांसोबत राहायचे की देश वाचवणाऱ्यांसोबत राहायचे याबद्दल सर्व राजकीय पक्षांनी विचार करण्याची वेळ आली असल्याचे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.

भाजपकडून देशात संविधानिक व्यवस्था पुरवण्याचे काम होत आहे. सामान्य माणसांना महागाईला सामोरे जावे लागत आहे. तसेच दररोज देशातील एक मालमत्ता केंद्र सरकार विकत आहे. देशाला असुरक्षा पोहचविण्याचा नकळत प्रयत्न भाजपकडून होत आहे. ममता बॅनर्जी यांनी केलेले वक्तव्य हे देश विकणाऱ्यासोबत असल्याचे स्पष्ट होत आहे, त्यामुळे आजच्या शिवसेनेच्या मुखपत्रकातून ममता बॅनर्जी यांच्यावर करण्यात आलेली टीका देशहिताची असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे.

तसेच येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवड होईल. तसेच यासंबंधी अनेक नावे समोर येत आहेत. त्यामुळे पुढील दिवसांत होणाऱ्या अधिवेशनात अधक्ष्यपदाचे नाव स्पष्ट होणार आहे, असे नाना पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version