Food Industry Growth In India : 6 लाख कोटींचा व्यापार! फक्त 5 रुपयांचा ‘हा’ चकणा बनला भारताच्या ‘स्नॅक इकॉनॉमी’चा राजा

मार्केट अँड डेटा रिसर्चच्या ताज्या अहवालानुसार, भारतातील पीनट बटर मार्केट 2025-2032 दरम्यान 11.21 टक्क्यांनी CAGR ने वाढण्याचा अंदाज आहे.
Food Industry Growth In India : 6 लाख कोटींचा व्यापार! फक्त 5 रुपयांचा ‘हा’ चकणा बनला भारताच्या ‘स्नॅक इकॉनॉमी’चा राजा

Food Industry Growth In India : देशात दारूसोबत सर्वाधिक खाल्ला जाणारा स्नॅक म्हणजे शेंगदाणा. फक्त 5 च्या पॅकेटमध्ये मिळणारा हा साधा शेंगदाणा किती मोठी अर्थव्यवस्था बनवतो, हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. 2024 पर्यंत भारतीय शेंगदाणा बाजारपेठेचे मूल्य तब्बल 7.45 अब्ज डॉलर, म्हणजेच अंदाजे 6 लाख कोटी रुपये इतके झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेंगदाणा अथवा पीनट बटरची मागणी गेल्या काही वर्षांत एवढ्या झपाट्याने वाढली आहे की आता त्याचा बाजार भारताच्या फूड इकॉनॉमीतील सर्वात जलद वाढणाऱ्या विभागांपैकी एक ठरला आहे.

हेही वाचा –  Pension Scheme: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! आजपासून NPS संदर्भातील 'हा' महत्त्वाचा पर्याय बंद

मार्केट अँड डेटा रिसर्चच्या ताज्या अहवालानुसार, भारतातील पीनट बटर मार्केट 2025-2032 दरम्यान 11.21 टक्क्यांनी CAGR ने वाढण्याचा अंदाज आहे. हा अंदाज आर्थिक वर्ष 2025 ते आर्थिक वर्ष 2032 या कालावधीसाठी आहे. त्याच्या वाढीची अनेक कारणे आहेत. भारतातील ग्राहक प्रथिनेयुक्त, कमी चरबीयुक्त आणि नैसर्गिक उत्पादनांना प्राधान्य देत आहेत, ज्यामुळे त्याची जलद वाढ होत आहे. शहरीकरण आणि पाश्चात्य जीवनशैलीचा प्रभाव पीनट बटरसारख्या उत्पादनांची मागणी वाढवत आहे. वाढत्या ई-कॉमर्स क्षेत्राने आणि व्यापक किरकोळ वितरणामुळे उत्पादनांची पोहोच आणखी वाढली आहे, ज्यामुळे ते अगदी लहान गावांमध्येही उपलब्ध झाले आहेत.

हेही वाचा –  Repo Rate : RBI रेपो रेट कमी करणार ? पुढच्या आठवड्यात होऊ शकते मोठी घोषणा

क्रिस्पी-क्रन्ची पीनट बटरची वाढती लोकप्रियता

उत्पन्नात जलद वाढ पीनट बटर बाजाराच्या वाढीमुळे महसुलातही लक्षणीय वाढ झाली आहे. 2021 मध्ये, क्रन्ची विभागाचा बाजारातील महसुलात 45 टक्क्यांपेक्षा जास्त वाटा होता. वाढत्या वापरामुळे आणि क्रन्ची पीनट बटरसाठी वाढत्या पसंतीमुळे त्याचा बाजारातील वाटा आणखी वाढला आहे. कुरकुरीत पीनट बटर थोडे आरोग्यदायी असते, कारण त्यात क्रिमी पीनट बटरपेक्षा कमी सॅच्युरेटेड फॅट आणि जास्त फायबर असते. आज पीनट बटर आणि फ्लेवर्ड शेंगदाण्यांचे पॅकेट ई-कॉमर्समुळे भारतातील अगदी छोट्या शहरांतही उपलब्ध आहेत. त्यामुळे मागणी रोज वाढत आहे. फक्त 5 मध्ये मिळणारा शेंगदाणा आता देशातील सर्वात मोठ्या 6 लाख कोटींच्या उद्योगाचा कणा बनला आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version