Pune Nagar Parishad Election Results: बालेकिल्ला शाबूत ! पुण्यात ‘दादां’चीच हवा; 17 पैकी 10 जागांवर राष्ट्रवादीची गुढी

पुण्याच्या ग्रामीण भागात आणि नगर परिषदांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले असून, 'पुण्याचे किंग अजितदादाच' असल्याचे निकालांवरून स्पष्ट झाले आहे.<br/>
Pune Nagar Parishad Election Results: बालेकिल्ला शाबूत ! पुण्यात ‘दादां’चीच हवा; 17 पैकी 10 जागांवर राष्ट्रवादीची गुढी

Pune Nagar Parishad Election Results: राजकीय घडामोडींनंतर अजित पवारांच्या वर्चस्वाला ओहोटी लागेल, अशा चर्चांना नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निकालांनी पूर्णविराम दिला आहे. पुण्याच्या ग्रामीण भागात आणि नगर परिषदांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले असून, 'पुण्याचे किंग अजितदादाच' असल्याचे निकालांवरून स्पष्ट झाले आहे.

पुणे जिल्ह्यात अजित पवारांची 10 जागांवर बाजी 

जिल्ह्यातील 17 महत्त्वाच्या जागांपैकी तब्बल 10 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. यामध्ये 9 नगराध्यक्ष आणि 1 युतीचा उमेदवार निवडून आला आहे. 2017 मध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले होते, मात्र या निवडणुकीत अजित पवारांनी अत्यंत सूक्ष्म नियोजन करत जिल्ह्यावर आपली पकड पुन्हा घट्ट केली आहे.

हेही वाचा – Kankavli Sandesh Parkar : निलेश राणेंमुळे ठाकरे गटाचा उमेदवार विजयी, नितेश राणेंना धक्का

भाजप आणि शिंदे गटाची पिछेहाट

महायुतीमध्ये असूनही या निवडणुकीत तिन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे नशीब आजमावले होते. मात्र, भाजप आणि शिवसेनेला (शिंदे गट) राष्ट्रवादीच्या झंझावातासमोर मर्यादित यश मिळाले.

शिवसेना (शिंदे गट): 4 जागांवर समाधान मानावे लागले. (चाकण, जुन्नर, राजगुरूनगर, मंचर)
भाजप: केवळ 3 ठिकाणीच कमळ फुलवता आले. (सासवड, आळंदी, तळेगाव)
अपक्ष: माळेगाव नगरपंचायतीत जयश्री तावरे यांनी बाजी मारत सर्वांचे लक्ष वेधले.

हेही वाचा – Maharashtra Nagar Parishad, Panchayat Election Result 2025: पिंपळनेरमध्ये भाजपचा नगराध्यक्ष; सांगलीत शरद पवार गटाची मुसंडी

राष्ट्रवादीचे विजयी शिलेदार (नगराध्यक्ष):
अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने बारामतीसह महत्त्वाच्या शहरांवर आपला झेंडा कायम ठेवला आहे 
बारामती: सचिन सातव
इंदापूर: भरत शाह
दौंड: दुर्गादेवी जगदाळे
जेजुरी: जयदीप बारभाई
लोणावळा: राजेंद्र सोनवणे
शिरूर: ऐश्वर्या पाचरणे
भोर: रामचंद्र आवारे
फुरसुंगी: संतोष सरोदे
वडगाव मावळ: आंबोली ढोरे

महायुतीत 'मैत्रीपूर्ण' लढत, पण राष्ट्रवादीची सरशी

या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रित लढली होती, तर महायुतीतील घटक पक्ष (राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना) एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. या तिरंगी आणि चौरंगी लढतींमध्ये अजित पवारांच्या संघटन कौशल्याने भाजप आणि शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. विशेषतः ग्रामीण भागातील मतदारांनी पुन्हा एकदा अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version