Chandrashekhar Bawankule : ‘आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राजकारण…’; चंद्रशेखर बावनकुळे यांचा राहुल गांधींना टोला

Chandrashekhar Bawankule : ‘आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राजकारण…’; चंद्रशेखर बावनकुळे यांचा राहुल गांधींना टोला

मुंबई : चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘रिलाँचिंग’ करण्याचा प्रयत्न काँग्रेसने थांबवावा, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. राहुल गांधींच्या पुढील महाराष्ट्र दौऱ्यापर्यंत आंदोलन पेटते ठेवण्याचा काँग्रेसचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 

काय म्हणाले बावनकुळे  

आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारने विद्यार्थ्यांशी चर्चा केली असून, त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेत लिखित आश्वासनही दिले आहे. सरकार विद्यार्थ्यांशी तीनदा चर्चा करू शकते, गरज पडल्यास चौथ्यांदा नव्हे तर हजारव्यांदा संवाद साधण्याचीही तयारी ठेवते. मग प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असतानाही आंदोलन सुरू ठेवण्याचा हट्ट का? विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राहुल गांधींच्या पुढील महाराष्ट्र दौऱ्यापर्यंत आंदोलन पेटते ठेवण्याचा काँग्रेसचा डाव हा आदिवासी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार आहे.

हेही वाचा : Nepal Flood : नेपाळचा मोठा निर्णय! भारत आणि अमेरिकेची मदत पथकं नाकारली; म्हणाला, ‘आम्ही आपत्ती हाताळण्यास…’

मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुविधा आणि शैक्षणिक संधी वाढविण्यासाठी शासन संवेदनशीलपणे काम करत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य घडविणे हा सरकारचा उद्देश आहे; मात्र काँग्रेसला विद्यार्थ्यांच्या करिअरपेक्षा आपल्या नेत्यांचे राजकीय करिअर वाचविण्याची अधिक चिंता असल्याचे या आंदोलनाच्या निमित्ताने स्पष्ट होत आहे.

आदिवासी समाजाच्या प्रश्नांशी खरोखरच काँग्रेसला आस्था असेल, तर त्यांनी विद्यार्थ्यांना राजकीय आंदोलनाचे साधन बनविण्याऐवजी सरकारसोबत संवाद साधावा. आदिवासी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नका आणि आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका! राहुल गांधींच्या राजकीय पुनरागमनासाठी आदिवासी विद्यार्थ्यांचा वापर करणे महाराष्ट्र कदापि स्वीकारणार नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version