UP Yogi Adityanath Action : महाराष्ट्रातील कारवाईचा देशभर डंका! मुंढेंच्या पावलावर पाऊल ठेवत योगी सरकारची ॲनालॉग डेअरी उत्पादनांवर कायदेशीर गदा

तुकारम मुंढे यांच्या पावलावर पाऊल ठेवत आता योगी सरकारने उत्तर प्रदेशातील जनतेला शुद्ध आणि सुरक्षित दुग्धजन्य पदार्थ मिळण्याचा मार्ग मोकळा केला आहे.
UP Yogi Adityanath Action : महाराष्ट्रातील कारवाईचा देशभर डंका! मुंढेंच्या पावलावर पाऊल ठेवत योगी सरकारची ॲनालॉग डेअरी उत्पादनांवर कायदेशीर गदा

महाराष्ट्रात आयएएस अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा दरारा आता भेसळखोरांमध्ये देखील पाहायला मिळत आहे. तुकाराम मुंढे यांनी ॲनालॉग पनीरवर बंदी घालून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळ माफियांना जोरदार धक्का दिला होता. सर्वसामान्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्रात तुकारम मुंढे यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेचा आदर्श आता इतर राज्यांत देखील घेण्यास सुरुवात केली आहे.

तुकारम मुंढे यांच्या पावलावर पाऊल ठेवत आता योगी सरकारने उत्तर प्रदेशातील जनतेला शुद्ध आणि सुरक्षित दुग्धजन्य पदार्थ मिळण्याचा मार्ग मोकळा केला आहे. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारनेही राज्यात बनावट पनीर, खवा आणि दुग्धजन्य पदार्थांवर पूर्णपणे बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. खाद्य सुरक्षा आणि मानके कायदा, 2006 (FSSAI) च्या तरतुदींनुसार उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील सर्व प्रकारच्या ॲनालॉग डेअरी उत्पादनांचे उत्पादन, साठवणूक आणि खुल्या विक्रीवर तात्काळ प्रभावाने बंदी घातली आहे.

हेही वाचा- Abhijeet Dipke : शिक्षण व्यवस्थेनंतर आता सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा नंबर; CJP कडून राज्यव्यापी 'हॉस्पिटल ठीक करो' मोहिमेची घोषणा

महाराष्ट्रातील होणाऱ्या मुंढे स्टाईल कारवाईंची दखल घेत उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये अन्न सुरक्षा विभागाने देखील धडक कारवाई टाकण्यास सुरुवात केली. या छाप्यात गोळा केलेल्या सॅम्पल्सच्या लॅब अहवालातून रिफाइंड तेल, सोयाबीन, टॅल्कम पावडर, डिटर्जंट, टायटॅनियम डायऑक्साइड आणि लिक्विड ग्लुकोजचा वापर करून बनावट पनीर आणि खवा तयार केला जात असल्याचा भयंकर प्रकार समोर आला.

त्याचसोबत दुधाला पांढरा रंग आणि घट्टपणा आणण्यासाठी सेफोलाइट, राणीपॉल, टिनोपॉल, हायड्रोजन पेरॉक्साइड यांसारख्या अत्यंत घातक रसायनांचा वापर उघडकीस आला आहे. यानंतर ॲनालॉग पनीर, ॲनालॉग क्रीम, ॲनालॉग तूप, ॲनालॉग छेना आणि ॲनालॉग खवा यासर्व प्रकारच्या ॲनालॉग डेअरी उत्पादनांवर योगी सरकारने बंदी घातली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version