Supriya Sule: ‘आजही वाटतं, तू कुठूनतरी अचानक येशील…’ रक्षाबंधनाच्या दिवशी सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट; वाचून तुमचेही डोळे पाणावतील

रक्षाबंधनाच्या दिवशी सुप्रिया सुळे यांनी दिवंगत अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत भावूक पोस्ट केली भावाच्या आठवणीने मन हेलावून टाकणारे शब्द त्यांनी व्यक्त केले
Supriya Sule: ‘आजही वाटतं, तू कुठूनतरी अचानक येशील…’ रक्षाबंधनाच्या दिवशी सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट; वाचून तुमचेही डोळे पाणावतील

रक्षाबंधनाचा सण देशभरात भाऊ-बहिणीच्या प्रेमाचं नातं जपण्यासाठी उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र यंदाचं रक्षाबंधन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी अत्यंत भावनिक ठरलं आहे. दिवंगत अजित पवार यांच्या आठवणीने त्यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे राजकारणात वेगवेगळ्या गटांमध्ये असले, तरी त्यांचं कौटुंबिक नातं कायमच चर्चेत राहिलं. राजकीय मतभेदांपेक्षा भाऊ-बहिणीमधील जिव्हाळ्याचं नातं अनेक प्रसंगी दिसून आलं होतं. यंदाच्या राखीपौर्णिमेला मात्र अजित पवार यांच्या अनुपस्थितीची जाणीव सुप्रिया सुळे यांच्या पोस्टमधून प्रकर्षाने जाणवली.

पोस्ट मध्ये सुप्रिया सुळेंनी नेमकं काय म्हटलं?
प्रिय दादा,

आज राखीपौर्णिमा… पण यावेळी तू सोबत नाहीस, ही जाणीव मनाला खूप अस्वस्थ करत आहे. सात महिन्यांपूर्वीची ती भीषण सकाळ आणि तुझं अचानक निघून जाणं… यावर आजही विश्वास बसत नाही.

लहानपणापासून एकत्र वाढताना आपली भांडणं, एकमेकांवरचं प्रेम आणि एकमेकांविषयीचा अभिमान हाच आपल्या नात्याचा पाया होता. आजही वाटतं, तू कुठूनतरी अचानक येशील, राखी बांधून घेशील, बहिणींसोबत गप्पागोष्टी करत पुन्हा कुटुंबात रमून जाशील…

तुझ्या नसण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणारी नाही. तू जिथे असशील, तिथून तुझं प्रेम आणि आशीर्वाद असेच सदैव पाठीशी राहू दे! 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version