Supriya Sule Daughter Reception: रेवती सुळे यांच्या रिसेप्शनला मोदींपासून गांधी कुटुंबापर्यंत बड्या नेत्यांची हजेरी; पवार कुटुंबातील ‘या’ सदस्याची मात्र गैरहजेरी चर्चेत

एका बाजूला देशातील दिग्गज राजकीय नेत्यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली, तर दुसरीकडे पवार कुटुंबातील एका महत्त्वाच्या सदस्याच्या गैरहजेरीने चर्चांना उधाण आलं आहे.
Supriya Sule Daughter Reception: रेवती सुळे यांच्या रिसेप्शनला मोदींपासून गांधी कुटुंबापर्यंत बड्या नेत्यांची हजेरी; पवार कुटुंबातील ‘या’ सदस्याची मात्र गैरहजेरी चर्चेत

दिल्लीत पार पडलेल्या रेवती सुळे आणि सारंग लखाणी यांच्या रिसेप्शनची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. एका बाजूला देशातील दिग्गज राजकीय नेत्यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली, तर दुसरीकडे पवार कुटुंबातील एका महत्त्वाच्या सदस्याच्या गैरहजेरीने चर्चांना उधाण आलं आहे. या रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. 

खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे आणि सारंग लखाणी यांच्या रिसेप्शनसाठी दिल्लीतील राजकीय वर्तुळातील अनेक दिग्गज एकाच छताखाली आले होते. या सोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींचीही चर्चा रंगली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिसेप्शनमध्ये तब्बल 20 मिनिटे उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी रेवती आणि सारंग यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यासोबत काही वेळ संवाद साधला. मोदी आणि शरद पवार एकत्र बसून गप्पा मारतानाचे फोटोही समोर आले आहेत.

हेही वाचा – SC On MPs Disqualification: ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयात मोठा दणका; बंडखोर 6 खासदारांबाबत मोठी अपडेट 

या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संपूर्ण पवार कुटुंबाने फोटो काढल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे या भेटीचे फोटो सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरले आहेत. दरम्यान, पवार कुटुंबातील जवळपास सर्वच सदस्य या रिसेप्शनला उपस्थित होते. मात्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची गैरहजेरी विशेष चर्चेत आली. सुनेत्रा पवार या रिसेप्शनला का उपस्थित राहिल्या नाहीत, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.सुनेत्रा पवार गैरहजर असल्या तरी अजित पवार यांचे दोन्ही पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी रिसेप्शनला आवर्जून हजेरी लावली. त्यामुळे पवार कुटुंबातील या उपस्थितीचीही राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. 

रिसेप्शनमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही उपस्थिती लक्षवेधी ठरली. अमित शाह यांनी रेवती आणि सारंग यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ते शरद पवार आणि सुळे कुटुंबीयांसोबत संवाद साधताना दिसले. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या शेजारी अमित शाह बसल्याचे दृश्यही कॅमेऱ्यात कैद झाले. याचदरम्यान राहुल गांधीही रिसेप्शनमध्ये उपस्थित होते. राहुल गांधी रिसेप्शनमध्ये असतानाच अमित शाह तेथे पोहोचले. अमित शाह नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी मंचावर गेले, त्यावेळी राहुल गांधी खाली उपस्थित होते. त्यामुळे एकाच सोहळ्यात भाजप आणि काँग्रेसमधील दिग्गज नेते एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version