राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार यांच्याकडे राज्याचे उपमुख्यमंत्रीपदासह अर्थखातंही होतं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष होते. त्यामुळे पक्षांची धुरा कोण सांभाळणार, तसेच उपमुख्यमंत्रीपदी कोण बसणार, या सर्व विषयांवर चर्चा रंगू लागल्या आहेत. याचपार्श्वभूमिवर सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलत असताना आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा- ठरलं! उद्याच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार?, राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी सुनेत्राताईंची निवड
सुनिल तटकरे म्हणाले की, “दादांच्या अकाली जाण्याच्या धक्क्यातून आम्ही सावलो नाही. आम्हाला वाटतंय दादा आजही आमच्यात आहे. आम्ही शोकमग्न अवस्थेत आजही राज्यभरात आहोत. त्यांच्या अनुपस्थित कार्यालयामध्ये आजही माझ्यासाठी येणे कलेशकारक आहे. ज्या ठिकाणी पक्षाचे कार्यालयात संघटन उभा केलं या विनम्र भावनेने मी कार्यालयात आलो. आज सूनेत्रा वहिनी आणि परिवार धार्मिक विधीमध्ये आहेत. धार्मिक विधी झाल्यानंतर आम्ही सर्व परिवाराशी चर्चा करू. त्यानंतर आम्ही आमच्या मनातलं आणि जनतेच्या मनातलं ठरवू. दादांनी संबंध महाराष्ट्र घडवला त्यांच्या दुःखद निधनानंतर राज्यशौकमग्न आहे. बाकीचा जो विषय असेल त्या चर्चा व्यतिरिक्त कुठलीही चर्चा झाली नाही”.
हेही वाचा- Pune News: पवारांच्या राष्ट्रवादीवर एकाच आठवड्यात दोन मोठे आघात; अजितदादांनंतर आता पुण्यातील ‘हा’ मोहरा हरपला
राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार?
उपमुख्यमंत्री पदाचा शपथीविधीसाठी आणखी दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बारामतीला जाणार आहेत. यादरम्यान सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर सर्व आमदारांची बैठक बोलवण्यात येणार आहे. आमदारांच्या बैठकीत गटनेता निवड आणि सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याबाबत प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. यानंतर आमदारांचा संमतीच पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार तसेच प्रस्ताव राज्यपाल याना देण्यात येणार आहे. राज्यपाल यांच्या समंतीनंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी मोठं विधान केलं आहे. जर उद्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय झाला तर उद्याच नव्या उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो असं त्यांनी म्हटलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.