शिवाजी पार्कनंतर आता ‘या’ ठिकाणाच्या नामकरणाला राज्य सरकारची मंजुरी

शिवाजी पार्कनंतर आता ‘या’ ठिकाणाच्या नामकरणाला राज्य सरकारची मंजुरी

मुंबईतील शिवाजी पार्कच्या नामकरणानंतर आता मुंबईतील अजून एका ठिकाणाचे नामकरण होणार असल्याचे समोर आले आहे.

मुंबईतील रेल्वे स्थानकांपैकी एक मुंबई सेंट्रल स्थानकाचे नामकरण होणार आहे. अनेक वर्षांपासून मुंबई सेंट्रलच्या नामकरणाची मागणी करण्यात आली होती.

त्या मागणीला आता राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. मुंबई सेंट्रलचे नामकरण होऊन आता भारतीय रेल्वेचे जनक म्हणून ओळखणारे जगन्नाथ शंकरशेट यांचे नाव या स्थानकाला देण्यात येणार आहे.

याची घोषणा राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत करण्यात आली. यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजूरीसाठी पाठवण्यात येणार आहे.

मुंबईचे आद्य शिल्पकार जगन्नाथ शंकरशेट यांचे मुंबईसाठी मोलाचे योगदान आहे. यामुळे त्यांचे नाव या स्थानकाला देण्याची मागणी केली होती. त्यांच्यामुळे मुंबईमध्य़े पहिली रेल्वे सुरू झाली.

कोण आहेत जगन्नाथ शंकरशेट ?

नाना शंकरशेठ यांचं मूळ नाव जगन्नाथ शंकरशेट मुरकुटे असं आहे. नानांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे झाला.

मुंबईच्या जडणघडणीत नाना शंकरशेठ याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.मुंबई विकासासाठी नानांनी स्वतःच्या जमिनी सरकारला दिल्या आहेत.

मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्टसाठी नानांनी एक लाख रुपयांची देणगी दिली आहे. तसेच कन्या शाळेसाठी स्वतःचा वाडा दिला आहे.

नानांची ‘भारतीय रेल्वेचे जनक’ म्हणून ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आहे. मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालय त्यांनी सुरू केलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version