Sonam Wangchuk Hunger Strike : दिल्लीत मध्यरात्री मोठी घडामोडी! अखेर 26 दिवसांनी सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले

नीट पेपरफुटीविरोधात सोनम वांगचुक यांनी सुरु केलेल्या उपोषणासंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. गुरुवारी मध्यरात्री 26 दिवसांनंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.
Sonam Wangchuk Hunger Strike : दिल्लीत मध्यरात्री मोठी घडामोडी! अखेर 26 दिवसांनी सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले

नीट पेपरफुटीविरोधात सोनम वांगचुक यांनी सुरु केलेल्या उपोषणासंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. गुरुवारी मध्यरात्री केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या भेटीनंतर तब्बल 26 दिवसांनंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. 28 जून रोजी सुरु केलेल्या नीट पेपरफुटी विरोधातील त्यांच्या उपोषणाला लाखो हजारो विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिला होता.

यावेळी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी तसेच देशाच्या शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी ऐक्य दर्शवण्यासाठी त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता. दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पक्ष यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरु झाले होते. दरम्यान 20 दिवसांनंतर त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना उपोषणस्थळावरून हटवण्यात आले आणि हरियाणातील गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्याशी चर्चेनंतर उपोषण सोडण्यात आलं.

हेही वाचा- Salman Khan Post: ‘सोनम बस झालं, आता घरी परत जा…’; NEET च्या विद्यार्थ्यांसाठी सलमान खानची भावूक पोस्ट

यावेळी सोनम वांगचुक यांनी सोशल मीडियावरही पोस्ट केली असून त्यात म्हटलं की, “केंद्रीय मंत्री श्री. जे. पी. नड्डा, डॉ. जितेंद्र सिंह आणि लेह लडाखच्या सर्वोच्च समितीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मी 26 दिवसांनंतर अखेर माझे उपोषण सोडले. यापूर्वी विविध राजकीय पक्षांच्या ६५ खासदारांनी मला भेट देऊन किंवा पत्रांवर स्वाक्षरी करून उपोषण सोडण्याचे आवाहन केले होते. देशात संभाव्य हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन आणि विविध अटींवर दीर्घ वाटाघाटींनंतर हे करण्यात आले. मी लवकरच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये या अटी सविस्तरपणे स्पष्ट करेन. दरम्यान, मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की, कुठेही कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होऊ न देण्यासाठी अत्यंत सतर्क राहा.” 

सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली. ‘एक्स’वरील पोस्टमध्ये पंतप्रधानांनी वांगचुक यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेण्याचे आणि लवकरात लवकर पूर्वीप्रमाणे निरोगी होण्याचे आवाहन केले. यावेळी मोदींनी म्हटलं की, “मी सोनमजींना आग्रह करते की त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपली दैनंदिन दिनचर्या सुरू ठेवावी आणि लवकरात लवकर आपले पूर्वीचे वजन पुन्हा मिळवावे. मी देवाकडे प्रार्थना करते की सोनमजी निरोगी राहोत.”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version