देशातील एकूण १७ राज्यांमधील ५५ जागांसाठी राज्यसभा निवडणुका होणार आहे. या ५५ जागांपैकी राज्यातील एकूण ७ जागांसाठी निवडणूक होणार आहे.
शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राज्यसभेच्या तिकिटीसाठी प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह माजी परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे स्पर्धेत होते. परंतु प्रियंका चतुर्वेदी यांनी बाजी मारली.
प्रियंका चतुर्वेदी यांनी एप्रिल २०१९ ला काँग्रेसमधून शिवसेनेत आल्या आहेत. प्रियंका चतुर्वेदी या शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवकत्या आहेत.
राज्यसभेच्या एकूण ५५ जागांसाठी २६ मार्चला निवडणुका होणार आहेत.
तसेच याच दिवशी निकाल देखील जाहीर होणार आहे.
तसेच भाजपकडून चौथ्या जागेसाठी भागवत कराड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान शरद पवार यांनी बुधवारी विधानभवनात राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर केला आहे.
उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांनी देखील उमेदवारी अर्ज गुरुवारी सादर केला आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज करण्यासाठी १३ मार्च हा शेवटचा दिवस आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.