Ganeshotsav Special Konkan Railway: गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांसाठी मोठी गुड न्यूज! निलेश राणेंतर्फे मोफत ‘शिवसेना एक्सप्रेस’; यादी समोर

गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर आणि सोयीचा व्हावा यासाठी सालाबादप्रमाणे यंदाही आमदार निलेश राणेंकडून विशेष रेल्वेगाडीची व्यवस्था करण्यात आली आहे.
Ganeshotsav Special Konkan Railway: गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांसाठी मोठी गुड न्यूज! निलेश राणेंतर्फे मोफत ‘शिवसेना एक्सप्रेस’; यादी समोर

दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, ठाणे, पालघर, पुणे आणि राज्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक व चाकरमानी दरवर्षी आपल्या गावी परततात. यंदा 14 सप्टेंबर 2026 रोजी घरोघरी लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात मुंबईहून कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे बुकिंग काही मिनिटांतच फुल्ल होते. त्यामुळे चाकरमान्यांची मोठी गैरसोय होते. या सुमारास प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी आणि गैरसोय लक्षात घेऊन आमदार निलेश राणेंनी मोठा निर्णय घेतला आहे.

गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर आणि सोयीचा व्हावा यासाठी सालाबादप्रमाणे यंदाही आमदार निलेश राणेंकडून विशेष रेल्वेगाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवासादरम्यान अधिकृत सरकारी ओळखपत्र सोबत असणे आवश्यक आहे, तसेच ज्या व्यक्तीच्या नावाने बुकिंग झाली आहे, तीच व्यक्ती प्रवास करू शकेल. त्यामुळे बुकिंग दुसऱ्याच्या नावे ट्रान्सफर करता येणार नाही.

हेही वाचा- Ganeshotsav 2026: बाप्पाच्या आगमनासाठी एसटी सज्ज! कोकणवासीयांसाठी जादा बससेवा जाहीर, 7 ते 25 सप्टेंबरदरम्यान धावणार तब्बल…

गणेशोत्सवानिमित्त 12 सप्टेंबरला दादर ते कुडाळपर्यंत शिवसेना एक्सप्रेस धावणार आहे. तर भाविकांना शिवसेना एक्सप्रेसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. गणेशोत्सवानिमित्त कुडाळ-मालवण विधानसभेचे आमदार निलेश नारायण राणे यांच्या संकल्पनेतून कोकणवासीयांसाठी खास भेट देण्यात आली आहे. सीट बुकिंगची प्रक्रिया सुरू झाली असून नागरिकांनी 8425901202, 8425901545 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तर बुकिंगची वेळ सकाळी 11.00 ते संध्याकाळी 5.00 सोमवार ते शनिवार आहे. या गाडीचे प्रस्थान दिनांक शनिवार, 12 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता होणार असुन प्रवास मार्ग दादर रेल्वे स्थानक ते कुडाळ रेल्वे स्थानक असणार आहे. मुंबईत आपल्या माणसांपासून लांब राहून दिवसरात्र काम करणाऱ्या कोकणातल्या चाकरमण्याला बाप्पाचा उत्सव कुटुंबासोबत साजरा करता यावा, या सामाजिक भावनेतून हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version