Sharad Pawar Meeting Sunetra Pawar : शरद पवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला, विलयनीकरणाची चर्चा होणार ?

अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत राजकिय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाल्या आहेत. शरद पवारांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेण्याकरिता पोहोचले आहेत.
Sharad Pawar Meeting Sunetra Pawar : शरद पवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला, विलयनीकरणाची चर्चा होणार ?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत राजकिय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाल्या आहेत. अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयीची सकारात्मक चर्चा झाल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटातील काही बड्या नेत्यांनी राष्ट्रवादी विलीनि‍करणावर आपली मतं मांडायला सुरुवात केली. अशातच ज्येष्ठ नेते शरद पवार हे बुधवारी सायंकाळी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्याकरिता पोहोचले आहेत. बारामतीमधील सहयोग सोसायटीमधील निवासस्थानी शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार तसेच राजेंद्र पवार आणि आमदार रोहित पवार हे देखील सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. यावेळी यावेळी सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार, श्रीनिवास पवार, आमदार रोहित पवार आदी उपस्थित होते. त्यामुळे पवार कुटुंबातल्या सदस्यांची राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा होऊन अंतिम तोडगा काढला जाऊ शकतो

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version