येत्या सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्यामुळे आता २४ जानेवारीपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. मात्र, आता राज्यातील कोचिंग क्लासेस असोसिएशनने शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर सवाल उपस्थित केला आहे.
राज्यातीळ शाळा सुरू होणार, मात्र खाजगी शिकवण्या कधी? असा सवाल कोचिंग क्लासेस असोसिएशनने उपस्थित केला आहे. त्यामुळे यावर निर्णय घेण्यात आला नाही तर विनापरवानगी ५० टक्के क्षमतेने खाजगी वर्ग सुरू करणार असल्याचा इशारा कोचिंग क्लासेस असोसिएशनने दिला आहे.
राज्यात सोमवारपासून शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे.
२४ जानेवारीपासून पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू.
शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे कोरोनाचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक.
स्थानिक प्रशासनाला शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार.
स्थानिक प्रशासनाने निर्णय घेताना परिस्थितीचा अंदाज घेणे.
शाळेत जाऊन लसीकरण प्रक्रिया करण्यात येईल, याची पडताळणी घेणे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.