Kolhapur Gokul Milk Union: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत नवं राजकीय समीकरण? सतेज पाटलांनी घेतली भाजप जिल्हाध्यक्षांची भेट

गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
Kolhapur Gokul Milk Union: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत नवं राजकीय समीकरण? सतेज पाटलांनी घेतली भाजप जिल्हाध्यक्षांची भेट

गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आणि जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या यड्राव येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी गोकुळ दूध संघाशी संबंधित राजकीय आणि निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. सतेज पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागांमध्ये भेटीगाठी आणि बैठका वाढवल्या आहेत. करवीरनंतर त्यांनी शिरोळ तालुक्यात दौरा केला. याच दौऱ्यात निंबाळकर यांच्या घरी झालेल्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.

या बैठकीला माजी आमदार राजूबाबा आवळे, दत्त कारखान्याचे गणपतराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य अर्चना चौगले, अमोल चौगले यांच्यासह काही प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. गोकुळच्या आगामी निवडणुकीत विविध राजकीय गटांकडून मोर्चेबांधणी सुरू असताना ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. एकीकडे महायुतीच्या माध्यमातून गोकुळची निवडणूक एकत्रितपणे लढवण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसच्या प्रमुख नेत्याची भाजप जिल्हाध्यक्षांच्या निवासस्थानी झालेली भेट राजकीय समीकरणांच्या दृष्टीने चर्चेचा विषय ठरली आहे

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version