नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीनंतर सध्या सर्वत्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी सर्वपक्ष तयारीला लागले आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर अनेक पक्षांमध्ये युती पाहायला मिळते आहे. नुकतीच ठाकरेंच्या पाठोपाठ पवारांच्या राष्ट्रवादीने देखील युतीचे संकेत दिले आहेत. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणूकांमध्ये भाजपने बाजी मारली आहे. या निवडणूकींमध्ये भाजपचे 129 नगरसेवक निवडून आले आहेत. राज्यातील 288 नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणूक 27 नगर परिषदांसाठी पार पडली. त्यापैकी 22 ठिकाणी भाजपाने यशस्वी निवडणूक जिंकली. दरम्यान या विजयावर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी म्हटलं की, महानगरपालिका आम्हाला जिंकायची आहे, महायुती विजय झेंडा फडकायाचा आहे. निवडून येणाऱ्या जागा घ्यायचे आहेत, फडणवीस आणि शिंदे यांची आज उद्या अंतिम बैठक होईल. एकत्र लढण्याची मानसिकता आहे. त्याचसोबत महायुतीतील युतीबाबत बोलताना संजय शिरसाट यांनी भाजपला निशाणा केल्याचा पाहायला मिळालं.
यावेळी छत्रपती संभाजीनगरमधील भाजप आणि शिंदेंच्या शिवसेना युतीवर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, “काही ठिकाणी स्थानिक ठिकाणी आता आलेला निकाल पाहून त्यांच्यावर परिणाम झाले आहे. याचा सर्व निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. शिंदे म्हणाले आहे महायुती करा, पण काही लोकांना महायुती करायची नाही असे दिसत आहे. संभाजीनगरला 4 बैठक झाल्या आहे, त्यांनी अवास्तव मागणी केली आहे, त्याच्यात एकमत नाही. सावेंशी आज भेट घेऊन ठरवू ,नाहीतर वरिष्ठ निर्णय घेतील. काही कार्यकर्ते असतात त्यांना युती व्हावी वाटत नाही. भांडण उकरून काढणे वाटत नाही, म्हणून आम्ही शांत आहोत…”
ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका करताना संजय शिरसाट म्हणाले की, “राज ठाकरे आग्रही आणि हट्टी देखील आहे. जोपर्यंत जागावाटप होत नाही तोपर्यंत त्यात युती होणार नाही. आधी जागावाटप होईल, त्यानंतर युती होईल. यांचा जीवच मुंबईत आहे, नगरपालिका निवडणुकीत एकही नेता फिरला नाही. मुंबई मोठी महानगरपालिका आणि त्यातून मिळणारी टक्केवारी, सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, त्यामुळे दरवेळी भावनिक प्रचार करतात. कितीही बोंबले तरीही जनतेने कौल दिले आहे. उबठा वक्तव्यला आम्ही महत्व देत नाही, आम्ही लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिका निवडणूक आम्ही जिकल्या,यांचा शिंदे यांचा नवं घेतल्याशिवाय दिवस निघत नाही, यांना कधीही यश मिळणार नाही. आम्हाला कल्पना नाही, त्यांची काय तडजोड झाली माहीत नाही. अब्दुल सत्तार उभा राहिला, त्याने सर्व ताकद धनुष्यबाणवर लावली, आता तुम्ही यांना घेत आहे त्यांचे परिणाम पहा… mim मत घेताना काही वाटले नाही का? गोदरेज कुलूप आणून लावा… बुक करा आणि त्यात सभा घ्या, त्या सभेला माणसे आना… गल्लीत सभा घेण्याची वेळ आली आहे. काय करावे आम्हाला अक्कल असल्याने आमचा पक्ष पुढे चालला आहे,तुमचा डब्ब्यात चालला आहे…उध्दव ठाकरे नदीवर बसण्याची वेळ आली आहे….”
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.