मुंबई : ऐन गणेशोत्सवात जरांगे मुंबईत येत असल्याने मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी चिंता व्यक्त केली आहे. राज्य सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईपर्यंत वाट पाहू नये. जरांगे यांच्याशी सरकारने चर्चा करून मार्ग काढावा. नाहीतर मुंबईत भीमा-कोरेगावसारखी परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला राज्य सरकारच जबाबदार असेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. मुंबईत कायद्यापेक्षा सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक आहे. सार्वजनिक उत्सव सुरू आहे. त्यामुळे जरांगेंनी मुंबईत येऊ नये ही पोलिसांची भूमिका आहे. ती योग्य आहे. राजकीय दृष्ट्या जरांगेंनी योग्य वेळ निवडली आहे. सरकारला कायदा सुव्यवस्था मेंटेन ठेवायची असेल तर सरकारच्या लोकांनी त्यांच्याशी बोलावं. हजारो लोक आले तर गंभीर परिस्थिती होईल. भीमाकोरेगाव सारखी परिस्थिती झाली तर त्याला राज्य सरकार आणि देशाचे गृहमंत्री जबाबदार असतील. हा राज्याचा प्रश्न आहे. प्रमुख विरोधी पक्षांना बोलावून यावर चर्चा करावी. त्या चर्चेत जरांगेंचे प्रतिनिधी असावेत. गणपती उत्सवात भडका उडाला तर गंभीर परिस्थिती निर्माण होईल. राज्य सरकारला गंभीर परिस्थिती निर्माण करायची आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
हेही वाचा : Sugar Price: गणेश भक्तांसाठी गोड बातमी! साखरेचे दर कोसळले, नवीन दर काय?
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.