Sanjay Raut : "महाराष्ट्राची ‘एपस्टिन फाईल’ उघडकीस" ज्योतिषी अशोक खरातच्या अटकेनंतर राऊतांचा घणाघात

एका बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात नाधिक मधील प्रसिद्ध ज्योतिषी अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ याला नाशिक क्राइम ब्रांचने अटक केली आहे. याचपार्श्वभूमिवर आता संजय राऊत यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.
Sanjay Raut : "महाराष्ट्राची ‘एपस्टिन फाईल’ उघडकीस" ज्योतिषी अशोक खरातच्या अटकेनंतर राऊतांचा घणाघात

एका बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात नाधिक मधील प्रसिद्ध ज्योतिषी अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ याला नाशिक क्राइम ब्रांचने अटक केली आहे. संबंधित संशयित आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. तपासादरम्यान पोलिसांनी काही व्हिडिओ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान यावेळी कॅप्टन खरात याचे कथित व्हिडिओ समोर आले. ज्यात स्वतःच्या ऑफिसमध्ये धार्मिक विधीच्या नावाखाली महिलेशी गैर प्रकार करतानाचा व्हिडिओ समोर आला. त्याचसोबत महिलेच्या डोक्यावर लोटी तांबे ठेवून तांत्रिक विधी सुरू असल्याचे व्हिडिओत समोर आले. तांत्रिक विधीनंतर महिलेशी गैरवर्तन केल्याचे व्हिडिओतून उघड झाले आहे. ऑफिसच्या बाहेर अनेक भाविक थांबलेले असताना, केबिनमध्ये कॅप्टन खरात याचे कृत्य समोर आले आहे. यानंतर पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या व्हिडिओंची सखोल तपासणी सुरू असून, त्यामधून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास नाशिक क्राइम ब्रांच करीत आहे. 

हेही वाचा- Amol Mitkari : “काही आमदार मला बोलतात, तुझा नेता गेला असता तर…” ; मिटकरींनी कोणत्या नेत्यांना सुनावलं?

संजय राऊतांच ट्विट काय?
याचपार्श्वभूमिवर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत निशाणाा साधला आहे. संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले की, “महाराष्ट्राची ‘एपस्टिन फाईल’ उघडकीस: अशोक खरातची अटक ही केवळ एक गुन्हेगारी घटना नाही—तर एका उच्चभ्रू शोषण रॅकेटचा पर्दाफाश आहे. स्वतःला “कॅप्टन” आणि ज्योतिषी म्हणून सादर करणाऱ्या अशोक खरातवर एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 58 अश्लील व्हिडिओ जप्त केले असून, त्यामध्ये अनेक महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे—ज्यात काही प्रभावशाली वर्तुळातील महिलाही असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. गेल्या अनेक वर्षांत, ज्योतिषाच्या माध्यमातून त्याने राजकारणी, सेलिब्रिटी आणि उच्चभ्रू वर्गात आपली ओळख निर्माण केली. या ओळखीच्या जोरावर, बंद दाराआड महिलांचे शोषण केल्याचे गंभीर आरोप आहेत. सत्तेच्या जवळीकतेमुळे आंधळा विश्वास निर्माण होतो—आणि त्यातूनच निर्माण होते प्रणालीगत शांतता, जी अशा प्रकारच्या अत्याचारांना खतपाणी घालते आता प्रश्न फक्त अशोक खरात कोण आहे हा नाही— तर त्याला संरक्षण कोणी दिलं? आणि त्या व्हिडिओंमध्ये आणखी कोण-कोण आहेत?”

रुपाली चाकणकरांचा धक्कादायक फोटो समोर
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री  राधाकृष्ण विखे पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यासोबतचे अशोक खरात याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आज सकाळीच रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातच्या डोक्यावर छत्री धरल्याचा फोटो समोर आला होतो. यानंतर त्यांचा आणखी एक धक्कादायक फोटो समोर आला आहे. यामध्ये रुपाली चाकणकर या अशोक खरातचे पाद्यपूजन करताना दिसत आहेत. रुपाली चाकणकर यांचा फोटो समोर येताच ठाकरे पक्षाच्या सुषमा अंधारेंनी रुपाली चाकणकरांवर हल्लाबोल केला आहे. या फोटोमुळे राजकीयवर्तूळात खळबळ उडाली आहे. 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version