नवी मुंबई : ‘मी रिक्षा चालवेन, पैसे कमवेन; पण मराठी बोलणार नाही’, असे जाहीरपणे सांगत उत्तर भारतीय विकास सेनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पंडित संजय दुबे यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्णयालाच थेट आव्हान दिले आहे. ‘जा, मराठी नहीं बोलता’, अशा उर्मट शब्दांत त्यांनी भूमिका मांडल्याने भाषेच्या मुद्द्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. रिक्षा आणि टॅक्सीचालकांना व्यवहारिक मराठीचे ज्ञान असणे बंधनकारक करून त्यासाठी देण्यात आलेली 15 ऑगस्टची मुदत संपली असतानाच नवी मुंबईतील एका रिक्षाचालकाचा आक्रमक व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.