रोहित पवार: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेले संशयाचे धुके आता अधिक गडद होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवण्यात आला होता. विमान अपघात प्रकरणातील अहवाल समोर आल्यानंतर आता सीआयडी अॅक्शनमोडमध्ये आल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पुणे सीआयडी कार्यालयात व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंह आणि कंपनीचे कर्मचारी यांची सीआयडी कार्यालयात कसून चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले, या प्रकरणानंतर अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शंका उपस्थित करत रोहित पवारांनी ट्वीट केले आहे.
यावेळी रोहित पवार ट्वीटमध्ये म्हणाले की, “अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूला कारणीभूत असलेल्या अनेकांपैकी एक कारण असलेला #VSR कंपनीचा मालक व्ही. के. सिंग याला CID ने चौकशीसाठी बोलावलं होतं की शाही पाहुणचारासाठी? याबाबतच आता शंका निर्माण झालीय. सकाळी 11 वाजता आल्यानंतर त्याची आठ तास चौकशी केल्याचं सांगण्यात आलं पण प्रत्यक्षात बहुतांश वेळ त्याची बडदास्त ठेवण्यात आणि पाहुणचार करण्यातच गेला. रात्री तर काळ्या काचा लावलेल्या पोलिसांच्या गाडीतून पाहुण्याप्रमाणे त्याची पाठवणी केली गेली.. यामागं काय काळंबेरं आहे म्हणून काळे कारनामे करणाऱ्याला असं काळ्या काचेच्या गाडीतून सोडलं गेलं? पण कितीही काळे पडदे टाकण्याचा प्रयत्न केला तरी याप्रकरणी सत्याचा सूर्य उगवल्याशिवाय राहणार नाही. एकीकडं आमचा हक्क असूनही या अपघाताबाबत FIR पण नोंदवून घेतला जात नाही पण दुसरीकडं ज्याच्या विमानाने अजितदादांना आपल्यातून हिरावून नेलं त्या व्ही. के. सिंगला मात्र कुणाच्या आशीर्वादाने VIP ट्रीटमेंट दिली जाते? याबाबतचं वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांनाही पोलीस अत्यंत चुकीची वागणूक देतात. अशा परिस्थितीत आतातरी अजितदादांसोबत काम केलेले आणि त्यांचे ‘विश्वासू’ सत्ताधारी आमदार जागे होतील का?”
अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूला कारणीभूत असलेल्या अनेकांपैकी एक कारण असलेला #VSR कंपनीचा मालक व्ही. के. सिंग याला CID ने चौकशीसाठी बोलावलं होतं की शाही पाहुणचारासाठी? याबाबतच आता शंका निर्माण झालीय. सकाळी ११ वाजता आल्यानंतर त्याची आठ तास चौकशी केल्याचं सांगण्यात आलं पण… — Rohit Pawar (@RRPSpeaks) March 6, 2026
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.