Roha Nagarpalika Election Result 2025: रोहा नगरपालिकेत राष्ट्रवादीचा एकहाती झेंडा; अजित पवार गटाची मोठी सरशी

रोहा नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने स्पष्ट बहुमत मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली आहे.
Roha Nagarpalika Election Result 2025: रोहा नगरपालिकेत राष्ट्रवादीचा एकहाती झेंडा; अजित पवार गटाची मोठी सरशी

रायगड : रोहा नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत नगरपालिकेवर एकहाती सत्ता मिळवली आहे. नगराध्यक्षपदी वनश्री समीर शेडगे यांचा विजय झाला असून, बहुसंख्य प्रभागांमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी दणदणीत यश संपादन केले आहे.

प्रभाग क्रमांक 1 अ मधून नीता महेश हजारे, तर 1 ब मधून प्रशांत कडू हे राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक 2 अ मध्ये फराह पानसरे यांनी विजय मिळवला असून, 2 ब मध्ये राजेंद्र जैन हे बिनविरोध निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक 3 अ मधून अफ्रिन रोगे, तर 3 ब मधून अरबाज मणेर यांनी राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला आहे.

प्रभाग क्रमांक 4 अ मध्ये स्नेहा अंबरे, तर 4 ब मध्ये अहमद दर्जी हे राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक 5 अ मधून आलमास मुमेर, तर 5 ब मधून महेंद्र गुजर यांनी विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक 6 अ मध्ये गौरी बारटक्के, तर 6 ब मध्ये पुन्हा एकदा महेंद्र गुजर हे विजयी ठरले आहेत.

हेही वाचा: Maharashtra Nagar Parishad, Panchayat Election Result 2025: पिंपळनेरमध्ये भाजपचा नगराध्यक्ष; सांगलीत शरद पवार गटाची मुसंडी

प्रभाग क्रमांक 7 अ मधून प्रियांका धनावडे, तर 7 ब मधून रवींद्र चाळके यांनी राष्ट्रवादीचा विजय निश्चित केला आहे. प्रभाग क्रमांक 8 अ मध्ये संजना शिंदे, तर 8 ब मध्ये महेश कोलटकर हे राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक 10 अ मधून पूर्वा मोहिते, तर 10 ब मधून अजित मोरे यांनीही राष्ट्रवादीसाठी यश मिळवले आहे.

दरम्यान, प्रभाग क्रमांक 9 अ मध्ये शिवसेना च्या सुप्रिया जाधव विजयी झाल्या असून, प्रभाग क्रमांक 9 ब मध्ये भारतीय जनता पक्ष चे रोशन चाफेकर यांनी विजय मिळवला आहे.

एकूणच रोहा नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने स्पष्ट बहुमतासह सत्ता मिळवत आपली ताकद अधोरेखित केली असून, हा निकाल रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

हेही वाचा: Kokan Election Result 2025: कोकणात महायुतीचा झंझावात; भास्कर जाधवांना मोठा धक्का, तर रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाजप-शिंदे सेनेचे वर्चस्व

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version