बुलडाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यातील केळवदयेथील स्टेट बॅंकेच्या शाखेवर दरोडा पडल्याची घटना घडली आहे. बुलडाण्यातील स्टेट बॅंकेच्या शाखेवर २० लाखांचा दरोडा पडला आहे. सकाळी बॅंकेच्या शिपाईने बॅंक उघडण्यास आला असता बॅंकेत दरोडा पडल्याचे लक्षात आले. त्यावेळी वरिष्ट पोलीस अधिकारी आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले.
बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे स्टेट बॅंकेच्या शाखेवर दरोडा पडल्याची घटना सकाळी उघड झाली. रात्रीच्या सुमारास स्टेट बॅंकेच्य खिडकीचे गज वाकवून चोरट्यांनी बॅंकेत प्रवेश केला. आणि गॅस कटरच्या मदतीने चोरट्यांनी बॅंकेची तिजोरी फोडली आणि तिजोरीतील २० लाख ८१ हजार ५७५ रुपये लंपास केले. सकाळी बँक उघडण्यासाठी जेव्हा शिपाई बँकेत आला. त्यावेळी शिपाईच्या बँकेत दरोडा पडल्याची बाब लक्षात आली.
बँकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पोलिसांना घडलेली घटना सांगितली. आणि लगेचच पोलीस उपाविभागीय अधिकारी सचिन कदम, बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गिते, चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार अशोक लांडे घटनास्थळी दाखल झाले. पोलीस घटनास्थळी पोहचताच त्यांनी तपास सुरु केला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.