पारंपरिक वेशभूषेत बुलेटस्वार महिलांची रॅली

पारंपरिक वेशभूषेत बुलेटस्वार महिलांची रॅली

औरंगाबादमध्ये महिला दिन निमित्त शहरात सकाळ पासूनच महिलांची धूम पाहायला मिळाली. सकाळच्या सुमारास डोक्यावर फेटा घालून पारंपरिक वेशभूषेत बुलेटस्वार महिलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. क्रांती चौकात आत्मरक्षणाचे प्रात्यक्षिक सर्वांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने महिलांची वाहन रॅली काढण्यात आली. विभागीय क्रीडा संकुल, जालना रोड,क्रांती चौक, पैठण गेट मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय अशी रॅली काढण्यात आली. या रॅलीत महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून बुलेट स्वार महिला प्रमुख आकर्षण ठरल्या. या रॅलीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, झुंबा डान्स असे वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले.

देहविक्री करणाऱ्या महिलांना दाखवला चित्रपट

पुण्यातल्या मनजित सिंग विरदी फाऊंडेशनच्या वतीने महिला दिनानिमित्त बुधवार पेठेतील देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी खास गंगुबाई काठियावाडी या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते. १५० महिलांना हा चित्रपट दाखविण्यात आला. यावेळी मनजित सिंग विरदी म्हणाले, गंगुबाई हा चित्रपट या महिलांच्या जीवनावर आधारित आहे, महिलांनाही चित्रपट पाहण्याचा आनंद मिळाला पाहिजे हा या मागचा उद्देश आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version