Maharashtra Politics : ‘गोपीनाथ मुंडेंची भाजपमधली घुसमट मी जवळून पाहिली’ बड्या नेत्याच्या गौप्यस्फोटाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

पृथ्वीराज चव्हाण यांच्या या दाव्यावर राज्यातील इतर नेत्यांकडून भूमिका स्पष्ट केली जात आहे.
Maharashtra Politics : ‘गोपीनाथ मुंडेंची भाजपमधली घुसमट मी जवळून पाहिली’ बड्या नेत्याच्या गौप्यस्फोटाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

भाजपाचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या दाव्यावर राज्यातील इतर नेत्यांकडून भूमिका स्पष्ट केली जात आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते या केलेल्या वक्तव्यानंतर आता राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यातच शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी 2004 ते 2014 या कालावधीमध्ये गोपीनाथ मुंडे यांची भारतीय जनता पक्षात होणारी घुसमट मी जवळून पाहिली होती असे म्हटले आहे.

शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी हे परळी येथे प्रभुवैद्यनाथाच्या दर्शनासाठी आले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राजू शेट्टी म्हणाले की युती सरकारच्या काळात गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांवर अन्यायकारक ठरणाऱ्या झोनबंदीच्या निर्णयाच्या विरोधात शरद जोशी यांचे नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर मध्ये आंदोलन केले होते. त्यावेळी मुंडे समिती स्थापन करत झोन बंदी उठवण्यात आली होती. तेव्हापासून माझे व त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते.

हेही वाचा- Sujay Vikhe Patil: महामार्गावरील खड्ड्यांचं खापर ट्रम्प यांच्या डोक्यावर; भाजप नेत्याचा अजब दावा, ‘ट्रम्पमुळे महामार्गाचं काम रखडलं…

2004 ते 2009 पर्यंत मी त्यांच्यासोबत आमदार म्हणून काम केले तसेच 2009 ते 2014 या काळात देखील मी खासदार म्हणून त्यांच्यासोबत काम केले. त्यांच्या आग्रहाखातरच मी मोठी चूक केली होती ती म्हणजे एनडीए सोबत जाण्याची.. परंतु साहेब गेल्यानंतर मी ती चूक सुधारली. 2004 ते 2014 या दरम्यान गोपीनाथ मुंडे यांची भाजपामध्ये होणारी घुमट मी जवळून पाहिली होती असे देखील राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका कार्यक्रमादरम्यान मोठा राजकीय गौप्यस्फोट करत सांगितले की, गोपीनाथ मुंडे यांना काँग्रेसमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू होते. 'मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे यांच्याशी चर्चा झाली होती आणि काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही या प्रवेशाला मान्यता दिली होती. पक्षप्रवेशाच्या बदल्यात गोपीनाथ मुंडे यांनी केंद्रात मंत्रिपदाची मागणी केली होती,' असा दावा चव्हाणांनी केला.
पुढे बोलताना चव्हाण म्हणाले, 'तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना न विचारता मी सोनिया गांधींच्या संमतीने होकार दिला होता. मात्र, नंतर मनमोहन सिंग यांनी 'विरोधी पक्षातील नेत्याला मंत्री बनवणे म्हणजे लाच दिल्यासारखे होईल' असे स्पष्ट करत या मागणीस नकार दिला. त्यामुळे मुंडे यांचा पक्षप्रवेश होऊ शकला नाही.'

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version