नागपूर : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात मंगळवार, 18 ऑगस्ट 2026 रोजी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान उद्धव ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांच्या याचिकेवर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय हा Tenth Schedule म्हणजेच दलबदल विरोधी कायद्याच्या चौकटीबाहेरचा असून अध्यक्षांनी आपल्या अधिकारक्षेत्राची मर्यादा ओलांडल्याचा दावा सिब्बल यांनी केला. यावर उत्तर देताना विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून त्यांनी आपली बाजू मांडली आहे.
राहुल नार्वेकर म्हणाले की, कपिल सिब्बल हे आपल्या अशिलासाठी युक्तीवाद करत आहे ते स्वाभाविक आहे. त्यांना जी बाजू मांडायचे ते मुद्दे ते मांडतीलच. पण कपिल सिब्बल यांचं मत म्हणजे काही न्यायालयाचे मत नाही. मी विधानसभा अध्यक्ष म्हणून दिलेला निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाच्या निकषावर दिलेला आहे. त्यामुळे तो शाश्वत आहे. त्यामुळे तो टिकून राहिल, असे मला वाटते. हे प्रकरण न्यायालयात असल्याचे Legislative party आणि political patty हा फरक सर्वोच्च न्यायालयाने देखील ओळखला आहे. त्याबद्दल भाष्य केले आहे. तसेच आमच्या निकालात देखील ते आम्ही स्वीकारले आहे. दिलेला निकाल हा कशाच्या आधारे दिला आहे, याची सुस्पष्टता त्या निकालात दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने त्रिपल टेस्टचा फार्मुला दिला होता. त्या त्रिपल टेस्टच्या आधारावर जे योग्य आहे तो निर्णय घेतला गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील सांगितले की, पक्षाचे संघटन स्ट्रक्चर बघा, पक्षाची घटना बघा आणि लेजिस्लेटीव्ह स्टेंग्थ पाहा या तिन्हींचा अंदाज घेता मी निर्णय घेऊन आदेश दिला आहे. या प्रकरणात आता कोण काय म्हणतयं, यावर हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने जास्त बोलता येणार नाही. पण मी विधानसभा अध्यक्ष म्हणून दिलेला निर्णय हा शाश्वत आहे, एवढंच मी सांगेन, असेही नार्वेकर यांनी नमूद केले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.