Raghav Chadha: ‘माझ्या शांततेला माझी हार समजू नका…’; राघव चड्ढांचा ‘आप’ला निर्वाणीचा इशारा; सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत व्यक्त केली खदखद

चड्ढा यांनी त्यांच्या वक्तव्यात सांगितले की, ते नेहमीच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी संसदेत आवाज उठवत आले आहेत.
Raghav Chadha: ‘माझ्या शांततेला माझी हार समजू नका…’; राघव चड्ढांचा ‘आप’ला निर्वाणीचा इशारा; सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत व्यक्त केली खदखद

नवी दिल्ली: राघव चड्ढा यांनी राज्यसभेतील उपनेते पदावरून कमी करण्यात आल्यानंतर प्रथमच सार्वजनिकरित्या प्रतिक्रिया दिली आहे. आम आदमी पार्टी (AAP) चे नेते असलेल्या चड्ढा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हिडिओ शेअर करत पक्षाच्या निर्णयावर अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांना संसदेत बोलण्यापासून रोखले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

चड्ढा यांनी त्यांच्या वक्तव्यात सांगितले की, ते नेहमीच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी संसदेत आवाज उठवत आले आहेत. “जेव्हा जेव्हा मला बोलण्याची संधी मिळते, तेव्हा मी जनतेच्या समस्या मांडतो. पण जनतेचे प्रश्न मांडणे हा काही गुन्हा आहे का?” असा थेट सवाल त्यांनी केला. त्यांनी स्पष्ट केले की, त्यांनी नेहमीच अशा मुद्द्यांवर भाष्य केले जे थेट सर्वसामान्यांच्या जीवनाशी संबंधित आहेत.

त्यांनी पुढे दावा केला की, आम आदमी पार्टीने राज्यसभा सचिवालयाला कळवले आहे की त्यांना संसदेत बोलण्याची परवानगी देऊ नये. “मी जेव्हा बोलतो, तेव्हा देशातील सामान्य माणसाच्या समस्या मांडतो. मग माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न का केला जातो?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा: INS Taragiri: शत्रूच्या रडारलाही चकवा देणार; भारताची सागरी सुरक्षा आता अभेद्य

राघव चड्ढा यांनी त्यांच्या भाषणात अनेक मुद्द्यांचा उल्लेख केला. विमानतळांवरील महागडे अन्नपदार्थ, झोमॅटो आणि अन्नपदार्थ डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या समस्या, अन्नातील भेसळ, टोल प्लाझावरील अतिरिक्त बँक शुल्क, मध्यमवर्गावरील करांचा वाढता बोजा, कंटेंट क्रिएटर्सवरील कारवाई, तसेच टेलिकॉम कंपन्यांच्या रिचार्ज धोरणांवर त्यांनी संसदेत आवाज उठवल्याचे सांगितले.

त्यांनी असेही म्हटले की, या मुद्द्यांमुळे सामान्य नागरिकांना थेट फायदा झाला आहे. “जनतेने मला कायम पाठिंबा दिला आहे, प्रोत्साहन दिले आहे, यासाठी मी त्यांचा आभारी आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी समर्थकांना सोबत राहण्याचे आवाहनही केले आहे.

शेवटी, त्यांनी पक्षाकडेही अप्रत्यक्ष संदेश देत म्हटले की, “माझ्या शांततेला माझी हार समजू नका. मी एक अशी नदी आहे जी वेळ आल्यावर पूर बनते.” त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. 

हेही वाचा: Phaltan Doctor Case: फलटणच्या डॉक्टर मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; निलंबित PSI गोपाल बदनेला जामीन मंजूर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version