MNS Activist Arrested : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो भिंतीवरून काढणं भोवलं; मनसे कार्यकर्ता आशिष साबळे पोलिसांच्या ताब्यात

MNS Activist Arrested : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो भिंतीवरून काढणं भोवलं; मनसे कार्यकर्ता आशिष साबळे पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : पुण्यातील एका सरकारी महाविद्यालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो बळजबरीने काढल्याच्या आरोपावरून पुणे शहर पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्मिती सेनेचे (मनसे) कार्यकर्ते आशिष साबळे यांना अटक केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणी चतुशृंगी पोलिसांनी साबळे यांना अटक केली असून, यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (मनविसे) अध्यक्ष अमित ठाकरे आणि पक्षाचे २०-२५ अज्ञात पदाधिकारी, विद्यार्थी व कार्यकर्ते यांच्याविरुद्धही गुन्हा (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : Manoj Jarange: ‘तुमच्या शब्दाचा मान राखतो..’ जरांगे पाणी प्यायले; सलाईन घेतो म्हणाले.. पण उपोषणावर ठाम

हे प्रकरण गणेशखिंड परिसरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील (गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज) एका घटनेशी संबंधित आहे. या घटनेत, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांच्या शेजारी पंतप्रधान मोदींचा फोटो लावण्यावर ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी कथितरीत्या आक्षेप घेतला होता. एफआयआरनुसार (FIR), ही घटना सोमवारी दुपारी १२.३० ते १.१५ या वेळेत घडली. डॉ. राजेंद्र काशीराम पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की, ठाकरे आणि पक्षाच्या इतर कार्यकर्त्यांनी परवानगीशिवाय महाविद्यालयाच्या कार्यालयात प्रवेश केला आणि पंतप्रधान मोदींचा फोटो काढून टाकला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version