T20 World Cup 2026 Hardik Pandya : फायनल दरम्यानचं सेलिब्रेशन हार्दिक पांड्याच्या अंगाशी; एका कृत्यावरुन थेट FIR दाखल

भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने देखील भारताच्या विजयाचा जंगी आनंद साजरा केला. या सेलिब्रेशन दरम्यान एक कृती हार्दिक पांड्याच्या अंगाशी आली आहे.
T20 World Cup 2026 Hardik Pandya : फायनल दरम्यानचं सेलिब्रेशन हार्दिक पांड्याच्या अंगाशी; एका कृत्यावरुन थेट FIR दाखल

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव केल्यानंतर, भारताने 2026 चा टी-20 विश्वचषक जिंकून इतिहास रचला. या विजयानंतर टीम इंडियातील प्रत्येक खेळाडू विजयाचा आनंद साजरा करताना दिसला. भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने देखील भारताच्या विजयाचा जंगी आनंद साजरा केला. 

हेही वाचा- IPL 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली! BCCI कडून IPL च्या पहिल्या टप्प्याची घोषणा; पाहा संपूर्ण वेळापत्रक

या सेलिब्रेशन दरम्यान एक कृती हार्दिक पांड्याच्या अंगाशी आली आहे. भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि त्याची जोडीदार, मॉडेल-अभिनेत्री माहिका शर्मा यांचे रोमँटिक क्षण कॅमेऱ्यात कैद झाले. हार्दिक पंड्याने सामना संपल्यानंतर राष्ट्रीय ध्वजाला आपल्या शरीराभोवती गुंडाळलं होतं. राष्ट्रीय ध्वज शरीराभोवती गुंडाळलेलं असताना हार्दिकने त्याची त्याची जोडीदार, मॉडेल-अभिनेत्री माहिका शर्माला मिठी मारत किस केलं. इतकंच नव्हे तर दोघेही मैदानातील बक्षीस वितरणासाठी उभारण्यात आलेल्या स्टेजवर झोपले होते.

हेही वाचा- ICC Prize Money: विजेत्या टीम इंडियावर कोट्यवधींचा वर्षाव! ICC कडून बक्षीस रकमेची घोषणा

या सगळ्या गोष्टी व्हायरल होताच पुण्याच्या एका वकिलाने हार्दिक पांड्या विराधात पोलीसात तक्रार दाखल केली आहे. स्थानिक वकिल वाजिद खान यांनी हार्दिक विरोधात तक्रार दाखल करत म्हटलं की, हार्दिक पंड्याने मॅच संपल्यानंतर सेलिब्रेशन करताना राष्ट्रीय ध्वज तिरंग्याचा अपमान केला. राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान करणं प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे. या प्रकरणात कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. असं म्हणत हार्दिक पंड्या विरोधात पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली आहे. दरम्यान पोलिसांनी अद्याप हार्दिक पंड्या विरोधात FIR नोंदवलेला नाही. दरम्यान हार्दिक आणि महिकाच्या या कृत्यावरुन सोशल मीडियावर चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version