‘मुंबईत ये मग दाखवतो’

‘मुंबईत ये मग दाखवतो’

मुंबई : मनोज जरांगे देवेंद्र फडणवीस यांचा एकेरीत उल्लेख करणे, आक्षेपार्ह भाषेचा वापर करणे हे प्रकार सातत्याने करत आहेत. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन भाजपाच्या प्रसाद लाड यांनी जरांगे यांना थेट इशारा दिला. मुंबईत ये मग दाखवतो, या शब्दात लाड यांनी जरांगेंना इशारा दिला. जरांगे आपल्या मागण्यांसाठी कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करायला स्वतंत्र आहात. पण आंदोलनाच्या नावाखाली राजकारण करणे, ठरवून विशिष्ट व्यक्तीचा अपमान करणे असे वर्तन करणे थांबवा, असाही इशारा लाड यांनी जरांगेंना दिला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version