प्रशांत घरत यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळावा यासाठी पाठपुरावा करणार – आदिती तटकरे

प्रशांत घरत यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळावा यासाठी पाठपुरावा करणार – आदिती तटकरे

मुंबईहून मांडव्याच्या दिशेने जाणारी बोट १४ मार्चला उलटली होती. यावेळी पोलीस नाईक प्रशांत घरत यांनी प्रसंगावधान दाखवल्याने ८८ जीव वाचवले यानंतर पोलीस नाईक प्रशांत घरत यांचा सर्वत स्तरातून कौतुक करण्यात आलं.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही प्रशांत घरत यांनी केलेल्या या कामगिरीसाठी त्यांचा सन्मान केला.

दरम्यान आता प्रशांत नाईक यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळावा यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याची माहिती राज्यमंत्री आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. आदिती तटकरे यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

आदिती तटकरे यांनी एक फोटो ट्विट केला आहे. यामध्ये पोलीस नाईक प्रशांत घरत यांचा सत्कार करतानाचा फोटो शेअर केला आहे. याफोटोत रायगड जिल्हा पोलीस अधिकारी उपस्थित होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version