PM Narendra Modi Instagram Video: पंतप्रधान मोदींचा नवा इन्स्टाग्राम व्हिडीओ समोर, तरुणांना दिला खास संदेश, म्हणाले, ‘जो खेलेगा…’

PM Narendra Modi Instagram Video: पंतप्रधान मोदींचा नवा इन्स्टाग्राम व्हिडीओ समोर, तरुणांना दिला खास संदेश, म्हणाले, ‘जो खेलेगा…’

क्रीडा क्षेत्रात भारताची कामगिरी उंचावत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदकविजेत्या भारतीय खेळाडूंशी संवाद साधला. ग्लासगो येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत देशाचं नाव उंचावणाऱ्या खेळाडूंची मोदी यांनी रविवारी भेट घेतली. नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीचा एक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यातील संवादाची सध्या चर्चा होत आहे.

या भेटीदरम्यान मोदी यांनी भारतीय खेळाडूंचं अभिनंदन करत त्यांच्या मेहनतीचं आणि कामगिरीचं कौतुक केलं. खेळाडूंनीही पंतप्रधानांसोबत झालेल्या भेटीचा अनुभव शेअर केला. बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या साक्षी चौधरी यांनी मोदींसोबतच्या संवादाबद्दल आनंद व्यक्त केला. पंतप्रधान अतिशय सहजपणे आणि आपुलकीने खेळाडूंशी संवाद साधतात, असं त्यांनी सांगितलं. या भेटीतील काही क्षण मोदींनी आपल्या इन्स्टाग्रामवरील व्हिडीओतून चाहत्यांसमोर आणले आहेत.

याच संवादादरम्यान साक्षी चौधरी यांनी मोदींना तरुणांसाठी काहीतरी संदेश देण्याची विनंती केली. त्यावर पंतप्रधानांनी कोणताही मोठा उपदेश न करता अवघ्या काही शब्दांत तरुणांना खेळाकडे वळण्याचं आवाहन केलं. “जो खेलेगा, वो खिलेगा”, असा संदेश देत त्यांनी ‘भारत माता की जय’चा नारा देखील दिला. मोदींच्या या संदेशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार प्रदर्शन केलं. भारताने एकूण 39 पदकांसह चौथं स्थान मिळवलं. यात 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. बॉक्सिंगमध्येही भारताची कामगिरी विशेष ठरली असून या प्रकारात भारतीय खेळाडूंनी 10 पदकं मिळवली.  या यशानंतर मोदींची खेळाडूंशी झालेली भेट आणि तरुणांना दिलेला संदेश विशेष चर्चेचा विषय ठरला आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version