Gulabrao Patil : ‘302-307 कलम वाल्यांना खासदार केले’; गुलाबराव पाटलांचा ठाकरे गटावर घणाघात

Gulabrao Patil : ‘302-307 कलम वाल्यांना खासदार केले’; गुलाबराव पाटलांचा ठाकरे गटावर घणाघात

मुंबई : शिवसेनेचा आजा 60 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. हा दिवस शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे स्वतंत्ररित्या साजरा करत आहेत. शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा हा गोरेगाव येथील नेस्को मैदानात पार पडत असून यावेळी नेते गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटावर प्रहार केला. त्यांनी खासदार संजय राऊत यांना लक्ष्य करून खडेबोल सुनावले.

हेही वाचा : Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे करणार मोठी खेळी! खासदार फुटले, नेते फुटू नये म्हणून उचलणार मोठं पाऊल

काय म्हणाले गुलाबराव पाटील –

60 आकडा नाही हा संस्कार आणि इतिहास आहे. 1985 वेळी शिवसैनिक म्हणून शिवसेनेत आलो. मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणारी संघटना होती. 40 वर्ष काम केले शिवसैनिक तसेच नवीन शिवसैनिक पण आज उपस्थित आहे. पैसा नव्हता, वाहने नव्हती, मोबाईल नव्हते. तेव्हा पासून शिंदेसाहेबांनी हिंदुत्वाची रक्षा करण्याचे काम केले आहे. बघता बघता शिवसेना महाराष्ट्रभर पसरली. रिक्षावाला आमदार झाला. टोपी विकणारे चंद्रकांत खैरे आमदार झाले. शिवसैनिक प्रमुखांनी काम सांगायचे आणि शिवसेनेने काम करायचे एवढंच सुरू झाला. ज्या माणसाकडे मोटर चालवायचे लायसेन्स नव्हते. त्यांना ट्रक चालवायला दिले. त्यानंतर आम्ही गुवाहाटीला गेलो, तेव्हा सर्वांना समजले. Who is एकनाथ शिंदे हे सर्वांना कळाले. 40 रेडे मुंबईत आले तर कापले जातील, आम्ही आलो आमच्यावर टीका होते. आता 6 खासदार ऑपरेशन टायगरमधून सोबत आले. त्यावर काय काय बोलायला लागले. संजय राऊत एवढे शिव्या देत आहेत. या पाटलाच्या गावची शिवी ऐकली तर 4 दिवस एका जागेवरून उठणार नाहीत. 6 खासदारांचे काय झाले माहिती नाही, पण त्यावर एक मुलगा बोलत आहे की, पैसे देऊन फुटले आहेत. तुमच्या पक्षातले कोण कसे आमदार झाले तुम्हाला माहिती आहे का?. 302-307 कलम वाल्यांना खासदार केले. संजय राऊत तू बाळासाहेबांच्या आशीर्वादावर खासदार झाला, असा टोला पाटलांनी राऊतांना लगावला. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version