Ganeshotsav 2026 : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘वर्षा’वर गणरायाची पूजा, तर यंदा उर्वशी ठाकरेंच्या हस्ते गणपतीची प्राणप्रतिष्ठा; पाहा नेतेमंडळींच्या घरचे बाप्पा

Ganeshotsav 2026 : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘वर्षा’वर गणरायाची पूजा, तर यंदा उर्वशी ठाकरेंच्या हस्ते गणपतीची प्राणप्रतिष्ठा; पाहा नेतेमंडळींच्या घरचे बाप्पा

मुंबई : गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर राज्यात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये आज गणरायाचे आगमन झाले असून काही राजकीय नेतेमंडळींच्या घरीदेखील लाडक्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी आज लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पत्नी अमृता फडणवीस, मुलगी दिविजा यांच्या हस्ते बाप्पाची आरती करण्यात आली.

तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर सहकुटुंबीय गणपती बाप्पाचे आगमन केले. राज ठाकरे यांची मुलगी उर्वशी ठाकरे यांच्याहस्ते बाप्पाची पूजा करण्यात आली असून यावेळी राज ठाकरे यांचे अंगरक्षक शिवाजी होरे यांच्याकडून गणपती आगमनावेळी बासरी वादन करण्यात आले.

हेही वाचा : Sambhaji Nagar Ganeshotsav : भाजप, शिवसेना, ठाकरे गटाच्या नेत्यांकडून गणपती बाप्पाचा एकत्र जयघोष

घरोघरी आणि मंडळांमध्ये बाप्पाचं आगमन झालं असून भाजपचे खासदार विनोद तावडे यांच्या निवासस्थानी बाप्पाचं आगमन झालं. यापूर्वी बाप्पाच्या आगमनासाठी बाप्पाला पालखीमध्ये बसवून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संपूर्ण तावडे कुटुंब मिरवणुकीत उपस्थित होते. 

तसेच मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या महापौर निवासस्थानीदेखील गणरायाचे आगमन झाले असून त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. रितू तावडे म्हणाल्या की, आज मुंबईत सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरी होतं आहे. आमच्याकडेही आज गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना झाली. सर्वत्र सुख शांती लाभो. मुंबईकरांची मोठी जबाबदारी माझ्यावर आहे. मुंबईकरांवर येणारे विघ्न टळो, हीच या ईश्वर चरणी प्रार्थना.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version