Supriya Sule On Sharad Pawar NCP : "भाजपचे नेते आणि मी 21 वेळा भेटलो" एकीकडे राष्ट्रवादी भाजपसोबत जाण्याच्या चर्चांना उधाण, दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी दिले मोठे संकेत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे नेते विनोद तावडे या दोघांच्या भेटीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी सुचक विधान केलं आहे.
Supriya Sule On Sharad Pawar NCP : "भाजपचे नेते आणि मी 21 वेळा भेटलो" एकीकडे राष्ट्रवादी भाजपसोबत जाण्याच्या चर्चांना उधाण, दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी दिले मोठे संकेत

राज्याच्या राजकारणात दररोज महत्त्वाच्या घडामोडी घडत असून आमदार, खासदारांच्या बंडखोरीची उदाहरणही सर्रास पाहायला मिळत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून मोठी बातमी येत आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी महायुती सोबत जाणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीत दोन मतप्रवाह असल्याचे उघड झाले होते.

यावेळी पक्षातील एक गट हा राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षासोबत विलीनीकरणाची भूमिका व्यक्त करत होता. तर दुसऱ्या गटाला एनडीएसोबत जाण्याची इच्छा असल्याचे स्पष्ट झाले होते. असं असताना आता राष्ट्रवादी शरद पवार गटातील काही नेते महायुतीमध्ये सहभागी होण्यास सकारात्मक असून काही वरिष्ठ नेत्यांचं महायुतीला बाहेरून पाठिंबा द्यावा यावर चर्चा होणार असल्याचे समोर आले आहे.

याचपार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे या दोघांची मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधे शुक्रवारी बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुचक विधान केलं आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, "मला माहित नाही बैठक झाली. विनोदजी आणि आम्ही अनेक वेळा भेटलो आहे आम्ही एका कमिटीत आहोत. गेल्या महिन्याभरात मी आणि विनोदजी 21 वेळा भेटलो यात भाजपचे अनेक नेते होते. भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष देखील त्यात असतो असे अनेक नेते आमच्याबरोबर एकत्र असतात."

हेही वाचा- Sharad Pawar NCP : महाराष्ट्रातील राजकारणात मोठा भूकंप? शरद पवार गटाची भाजपसोबत हातमिळवणी? मुंबईसह दिल्लीतही हालचालींना वेग

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत दिसेल का? यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "आमची भूमिका सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्याची आहे. गेले बारा वर्षे आमच्याबद्दल सातत्याने बोलवलं जात आहे. भविष्यात असाच जर कारभार झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि आम्हाला लढावच लागेल आणि सत्ता घ्यावीच लागेल. देव जाणे पुढे हे काय करतील." त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आगामी काळात भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सहभागी होणार असल्याच्या चर्चा राज्यासह देशातील राजकारणात रंगू लागल्या आहेत. 

मुसद्दी राजकारणी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या संभाव्य राजकीय समीकरणाची चाचपणी करण्याची जबाबदारी पक्षाच्या एका अत्यंत ज्येष्ठ नेत्यावर सोपवल्याचे समजते. सध्या शरद पवार गटाकडे 10 आमदार आणि 8 खासदार असे संख्याबळ आहेत. केंद्रातील आणि राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, एनडीएला थेट सत्तेत सामील होऊन पाठिंबा द्यावा की बाहेरून मदत करावी, या दोन्ही पर्यायांवर पक्षांतर्गत चाचपणी सुरू आहे. या बड्या नेत्याने पक्षाच्या सर्व खासदार आणि आमदारांशी संपर्क साधून त्यांची मते जाणून घेण्यास सुरुवात केल्याचे समजते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version