सध्या राज्यात मराठा आरक्षणासंदर्भातील प्रलंबित मागण्या मार्गी लावण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू आहे. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा मुद्दा तापताना दिसतो आहे. मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे आंदोलन नेण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. अशातच ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांच्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.
ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तीन ते चार तरूणांनी हॉटेलमध्ये हाकेंवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी हल्ला करणारे तरुण हे मराठा आरक्षक मनोज जरांगेचे कार्यकर्ते असल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंनी केला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसरा, लक्ष्मण हाके हे आपल्या सहकाऱ्यांसह पाकणी फाटा येथील हॉटेल निसर्ग येथे भोजनासाठी थांबले होते. उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी फाटा येथील 'हॉटेल निसर्ग' येथे जेवणासाठी थांबले असताना, मराठा समाजाच्या काही तरुणांनी हाके यांच्याशी हुज्जत घालत त्यांच्यावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे हॉटेल परिसरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते. पोलिसांनी या प्रकरणी तीन तरुणांना ताब्यात घेतले आहे.
यावेळी लक्ष्मण हाकेंनी म्हटलं की, "जेवालय थांबलो होतो, आमच्यासोबत 10-12 पोलिस कर्माचारी होती. पहिल्या येऊन एकजण व्हिडीओ शूट करत होता आणि दुसरे काही लोक हुज्जत घालत होते. मनोज जरांगे पाटील यांचे कार्यकर्ते होते. ते दारू पिऊन आले होते. हॉटेलमध्ये दार लावून आम्ही जेवलो, तो भ्याड हल्ला होता. ओबीसीचा आवाज दाबण्याचा हा हल्ल्याच्या माध्यमातून प्रयत्न होता. हा माझ्यावर झालेला अकरावा हल्ला होता आणि तो भ्याड हल्ला होता हे सगळे कार्यकर्ते जरांगेचे होते. लक्ष्मण हाकेचा जीव गेला तरी आम्ही ओबीसीचा आवाज थांबवणार नाही. ओबीसीच्या नेत्यांवर हल्ले करून शिवीगाळ करून तू आरक्षण घेऊ शकत नाहीत. पोलीस बंदोबस्त असताना देखील हे आमच्यावर हल्ले करतायेत म्हणजे हे कायद्याला मानत नाहीत."
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.