‘लस नाही, प्रवेश नाही’; नाशिक प्रशासनाचा निर्णय

‘लस नाही, प्रवेश नाही’; नाशिक प्रशासनाचा निर्णय

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये प्रशासन सतर्क झाले असून जिल्ह्यात लसीकरणावर भर दिला आहे.  एकीकडे नाशिककर बेफिकीर झाले आहेत. तर दुसरीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील काही दिवसांत नाशिकमध्ये कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ  झाली आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात ‘नो व्हॅक्सिन नो एन्ट्री’चा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिकमध्ये लसीकरण पूर्ण न झालेल्या नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारला जाणार असल्याचा नियम प्रशासनाने घेतला आहे. तसेच शासकीय कार्यलयात आणि खासगी ठिकाणी लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. कोरोना लसीकरणाबाबतचा ‘नो व्हॅक्सिन नो एन्ट्री’चा नवा नियम येत्या २३ डिसेंबरपासून लागू होणार आहे. त्यामुळे लसीकरण पूर्ण न झालेल्या नागरिकांचा सार्वजनिक ठिकाणांवरील प्रवेश नाकारला जाणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version