Nilesh Rane Slams Aditya Thackeray: ‘TRP साठी काहीही बोलणार…’ आदित्य ठाकरेंचं शिंदेंबाबतचं वक्तव्य; निलेश राणेंनी थेट लायकीच काढली

आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेनंतर नीलेश राणे आक्रमक झाले आहेत. त्यांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार शब्दांत पलटवार केला.
Nilesh Rane Slams Aditya Thackeray: ‘TRP साठी काहीही बोलणार…’ आदित्य ठाकरेंचं शिंदेंबाबतचं वक्तव्य; निलेश राणेंनी थेट लायकीच काढली

मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे गट आणि राणे कुटुंबीयांमधील संघर्ष तीव्र झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर भाजप आमदार नीलेश राणे यांनी जोरदार पलटवार केला आहे. आदित्य ठाकरे यांनी बोलताना संयम आणि शिस्त पाळावी, अन्यथा आम्ही उत्तर दिल्यास ते ऐकणं कठीण जाईल, असा इशारा नीलेश राणे यांनी दिला.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नीलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यासोबतच खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. “राजकारणात टीका करणे वेगळे आणि वैयक्तिक पातळीवर बोलणे वेगळे असते. आदित्य ठाकरेंनी आपली भाषा आणि मर्यादा लक्षात ठेवावी. आम्ही बोलायला लागलो तर त्यांना ते सहन होणार नाही,” असे राणे म्हणाले.

राज्यातील सत्तासंघर्ष आणि पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये सातत्याने शाब्दिक चकमकी होत असून, त्यात आता राणे कुटुंबीयांचीही भर पडली आहे.

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?

विधानसभेच्या कामकाजादरम्यान सभागृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. सरकारमधील काही मंत्री आपल्या खात्यांचा पुरेसा अभ्यास करत नसल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले होते, “स्वतःच्या खात्याची उत्तरं देता येत नसल्यामुळे दुसऱ्या मंत्र्यांकडे जबाबदारी ढकलली जाते. फेकनाथ मिंधे उत्तर द्यायला घाबरतात आणि पळ काढतात. आमच्या सरकारच्या काळात असा प्रकार कधीच झाला नव्हता.”त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, शिंदे गटातील नेत्यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version